भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (South Africa vs India) नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यावर झालेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता, तर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज वनडे आणि टी२० मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. भारताचा वनडे मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे.(Indian odi Squad for odi series against West Indies)
या खेळाडूंचे झाले संघात पुनरागमन
येत्या ६ फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात कुलदीप यादवला संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. काही वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर त्याला पुन्हा एकदा पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तसेच युवा फिरकीपटू रवी बिष्णोईची देखील या संघात निवड करण्यात आली आहे. त्याला पुनरागमन करण्याची संधी असणार आहे. तर दीपक हुड्डाची निवड सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे.
हे खेळाडू वनडे मालिकेतून बाहेर
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार केएल राहूलला देखील पहिल्या वनडे सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. तसेच रवींद्र जडेजाला देखील या मालिकेत संधी देण्यात आली नाहीये. कारण तो अजूनही पूर्णपणे दुखापतीतून सावरला नाहीये, तर अक्षर पटेलला टी२० संघात स्थान देण्यात आले आहे.
रोहित शर्माचे होणार पुनरागमन
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून बाहेर झाला होता. परंतु, तो आता पूर्णपणे फिट असून वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील तो पुनरागमन करणार आहे. विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढल्यानंतर कर्णधार म्हणून ही त्याची पहिलीच वनडे मालिका असणार आहे.
ODI squad: Rohit Sharma (Capt), KL Rahul (vc), Ruturaj Gaikwad, Shikhar, Virat Kohli, Surya Kumar Yadav, Shreyas Iyer, Deepak Hooda, Rishabh Pant (wk), D Chahar, Shardul Thakur, Y Chahal, Kuldeep Yadav, Washington Sundar, Ravi Bishnoi, Mohd. Siraj, Prasidh Krishna, Avesh Khan
— BCCI (@BCCI) January 26, 2022
असा आहे वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
महत्वाच्या बातम्या:
कोण असेल भारताचा पुढील कर्णधार? स्मिथने टाकले ‘या’ दोघांच्या पारड्यात वजन
मलिंगा इज बॅक! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा दिसणार श्रीलंकेच्या डग आऊटमध्ये
हे नक्की पाहा: