सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून(७ जानेवारी) दुसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात सलामीला फलंदाजीसाठी शुबमन गिल आणि रोहित शर्मा उतरले. या दोघांनीही भारताचा चांगली सुरुवात करुन देत अर्धशतकी भागीदारी केली. याबरोबरच त्यांनी एक खास कामगिरी केली आहे.
या दोघांनी २७ षटके फलंदाजी करताना ७० धावांची भागीदारी रचली. त्यामुळे तब्बल १० वर्षांनंतर आणि ९२ कसोटी डावांनंतर आशिया खंडाबाहेर भारतीय सलामी जोडीने डावाची पहिली २० किंवा त्यापेक्षा अधिक षटके बाद न होता खेळण्याची कामगिरी केली आहे.
यापूर्वी सेंच्यूरियन येथे डिसेंबर २०१० ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी सलामीला २९.३ षटके बाद न होता फलंदाजी केली होती. त्यांच्यानंतर गेल्या १० वर्षात आशिया खंडाबाहेर खेळताना प्रत्येकवेळी किमान एकतरी सलामीवीर २० षटकांच्या आत बाद होत होता. अखेर रोहित आणि गिलने २७ षटके फलंदाजी करत या नकोशा कामगिरीला खंड पाडला.
हेजलवूडने रोहितला बाद करत तोडली भागीदारी –
बर्थडे बॉय जॉस हेजलवूडने २७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहितला २६ धावांवर स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यामुळे रोहित आणि गिलची भागीदारी तुटली. रोहित बाद झाल्यानंतर लगेचच काहीवेळात गिलही अर्धशतक करुन बाद झाला. गिलने ५० धावा केल्या. भारताने दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ९६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कसोटी फलंदाजांची नावे ऐकून गोलंदाजांचा उडतो थरकाप, काढल्यात खोऱ्याने धावा
वनडे, टी२० आणि कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा रोहित दुसराच, मग पहिलं नाव कुणाचं? वाचा
रोहित शर्माने लायनविरुद्ध मारलेला ‘तो’ षटकार ठरला ऐतिहासिक; पाहा काय आहे रेकॉर्ड