मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयात भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने महत्त्वाचे योगदान दिले आहे. या सामन्यातून आपले कसोटी पदार्पण केलेल्या शुभमने दोन्ही डावात भारताला उत्तम सुरुवात करुन दिली. त्याच्या या कामगिरीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे. शुभमनने आपल्या या कामगिरीत एका विशेष विक्रमाची देखील बरोबरी केली आहे.
शुभमन केवळ चौथा भारतीय सलामीवीर आहे, ज्याने आशिया बाहेर पदार्पण करताना दोन्ही डावात 25 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शुभमने पहिल्या डावात 45 तर दुसऱ्या डावात नाबाद 35 धावांची खेळी केली.
शुभमन पूर्वी नाउमल जिउमल यांनी 1932 साली आपल्या पदार्पणात 33 व 25 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 1971 साली लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना 65 आणि नाबाद 67 धावांची खेळी केली होती. शुभमन सोबत सलामीसाठी आलेल्या मयंक अग्रवालने 2018साली मेलबर्न येथेच कसोटी पदार्पण करताना 76 आणि 42 धावांची खेळी केली होती.
शुभमनच्या या कामगिरीमुळे बऱ्याच दिवसापासून डोकेदुखी ठरलेला सलामीचा प्रश्न सोडवण्यास भारतीय संघाला मदत होऊ शकते. त्यातच रोहित शर्मा बुधवारी(30 डिसेंबर) भारतीय संघात सामील होत आहे. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीत भारत सलामीला कोणाला संधी देणार हे पहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटीत १९९ धावांवर बाद होणारा फाफ डू प्लेसिस ठरला अकरावा, पाहा यापुर्वी कुणाचं हुकलंय द्विशतक
टीम इंडिया एकच नंबर! ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा आशियाई संघ
पैज लावली तरी चालेल.! रहाणेचं शतक आणि टीम इंडियाचा पराभव, शक्यच नाय…