क्राईस्टचर्च। न्यूझीलंडने भारताविरुद्ध हेगली ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी (2 मार्च) 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश दिला.
या सामन्यात न्यूझीलंडने जरी विजय मिळवला असला तरी त्यांचा कर्णधार केन विलियम्सनला या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. तो या सामन्याच्या दोन्ही डावात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने त्याला पहिल्या डावात 3 धावांवर तर दुसऱ्या डावात 5 धावांवर बाद केले.
त्यामुळे एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात केन विलियम्सनला बाद करणारा बुमराह दुसराच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. याआधी असा पराक्रम केवळ झहीर खानने केला आहे. झहिरने 2014 ला न्यूझीलंड विरुद्ध ऑकलंडला झालेल्या कसोटी सामन्यात विलियम्सनला पहिल्या डावात 113 धावांवर आणि दुसऱ्या डावात 3 धावांवर बाद केले होते.
हेगली ओव्हल स्टेडियमवर आज संपलेल्या कसोटी सामन्यात बुमराहने एकूण 5 विकेट्स घेतल्या आहेत.
केवळ त्या दोन भारतीय कर्णधारांवर ओढावली न्यूझीलंडमध्ये व्हाईटवॉशची नामुष्की https://t.co/3Ou7v6vx56#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) March 2, 2020
दुसऱ्या कसोटीतील विजयासह न्यूझीलंडचा टीम इंडियाला व्हाईटवॉश
वाचा👉https://t.co/CimuuDHeiU👈#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 2, 2020