क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणजेच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत यजमान भारतीय संघाचे प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. साखळी फेरी असो किंवा उपांत्य सामना, भारताने एकूण 10 सामने खिशात घातले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडलेल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडला 70 धावांनी मात दिली. तसेच, अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवले. आता 19 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडताना दिसेल. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. चला तर, शमीवर कशासाठी, का आणि कुणी बंदी घातली, ते पाहूयात…
मोहम्मद शमीवर बंदी
न्यूझीलंड संघाविरुद्ध वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) येथे पार पडलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात (Semi Final 1) भारताच्या विजयाचा नायक मोहम्मद शमी (Mohammed Shami) ठरला. त्याने सामन्यात 9.5 षटके टाकताना 57 धावा खर्चून सर्वाधिक 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. याच सामन्यात नाही, तर त्याने मागील सामन्यांमध्येही जबरदस्त प्रदर्शन केले होते. अशात सर्व भारतीय चाहते अंतिम सामन्यातही शमीकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा करत आहेत.
या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शमीवर बंदी घातली गेली आहे. मात्र, घाबरण्याची गरज नाही. कारण, ज्याप्रकारची ही बंदी समजली जात आहे, त्याप्रकारचा हा विषय नाही. विषय वेगळाच आहे. आता प्रत्येकजण याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, नेमकी ही कसली बंदी आहे. चला तर, याविषयी जाणून घेऊयात…
काय आहे प्रकरण?
खरं तर, सोशल मीडियाव एक ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. हे ट्वीट डिंडा अकादमी नावाने असलेल्या एका मीम्स अकाऊंटने टाकले आहे. यामध्ये लिहिले आहे की, “मोहम्मद शमीवर डिंडा अकादमीतून कायमची बंदी घातली गेली आहे.” खरं तर, डिंडा अकादमीचे नाव भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अशोक डिंडा याच्या नावावरून ठेवले आहे.
BIG BREAKING 📢
Indian Cricketer Mohammad Shami has been banned from Dinda Academy for life. pic.twitter.com/OYtPstW8yx— Dinda Academy (@academy_dinda) November 15, 2023
जेव्हाही कोणता गोलंदाज आपल्या षटकात सर्वाधिक धावा खर्च करतो, तेव्हा चाहते सोशल मीडियावर त्या गोलंदाजाचे नाव अशोक डिंडा अकादमीसोबत जोडून त्याची थट्टा उडवतात. आता शमीच्या प्रदर्शनानंतर हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.
मोहम्मद शमीचे स्पर्धेतील प्रदर्शन
मोहम्मद शमी याने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे फलंदाजांची दैना होत आहे. शमीच्या प्रदर्शनाविषयी बोलायच झालं, तर त्याने 3 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. तसेच, न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट्स घेत तो विश्वचषकातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही बनला आहे. त्याने आतापर्यंत फक्त 6 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 9.13च्या शानदार सरासरीने सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या आहेत. (indian pacer mohammed shami banned before the world cup 2023 final match know the truth here)
हेही वाचा-
Semi Final 2: कांगारूंकडून हारताच आफ्रिकेच्या हेड कोचचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘मला कसलाच फरक पडत नाही…’
World Cup 2023 Final पूर्वी मिचेल मार्शची रोहितसेनेला धमकी! म्हणाला, ‘2 बाद 450 धावा करून भारताला…’