भारतीय संघाने वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिमाखात एन्ट्री केली. विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. मोहम्मद शमी याच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंड संघ 327 धावांवर गुंडाळला गेला आणि भारताने 70 धावांनी विजय मिळवला. शमीच्या नावावर खास विक्रमाची नोंद देखील झाली.
विश्वचषकाच्या या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. निर्धारीत 50 षटकांमध्ये भारताने 4 विकेट्सच्या नुकसानावर 397 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ 48.5 षटकांमध्ये 327 धावांची खेळी करून सर्वबाद झाला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकासह मोहम्मद शमी याच्या 7 विकेट्स महत्वपूर्ण ठरल्या. न्यूझीलंडने या सामन्यात बऱ्यापैकी धावा केल्या असल्या तरी शमीने अवघ्या 5.79च्या इकॉनॉमीने धावा खर्च करून या विकेट्स घेतल्या.
या सामन्यातील अप्रतिम प्रदर्शनासाठी शमीला सामनावीर पुरस्कार मिळाला. शमी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विश्वचषक स्पर्धेतीत एखाद्या सामन्यात 7 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. तसेच एकंदरीत विचार केला, तर विश्वचषक सामन्यात 7 विकेट्स घेणारा तो पाचवा गोलंदाज बनला आहे. (Rohit Sharma becomes the first Indian captain to win 10 consecutive matches in ODI history)
विश्वचषक सामन्यात 7 विकेट्स घेणारे गोलंदाज
1983: विन्स्टन डेव्हिस
2003: ग्लेन मॅकग्रा
2003: अँडी बिचेल
2015: टिम साऊदी
2023: मोहम्मद शमी*
शमीच्या या सामन्यातील प्रदर्शन विश्वचषक नॉकआऊट सामन्यांमधील प्रदर्शन राहिले आहे. याआधी 1975 मध्ये गॅरी गिलमोर यांनीही विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत 14 धावा कर्च करून 6 विकेट्स गेतल्या होत्या.
विश्वचषकाच्या नॉकआऊट फेरीत सर्वोत्तम प्रदर्शन
7/57 – मोहम्मद शमी विरुद्ध न्यूझीलंड (2023)
6/14 – गॅरी गिलमोर विरुद्ध इंग्लंड (1975)
विश्वचषक 2023 उपांत्य सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
महत्वाच्या बातम्या –
शानदार शमी! न्यूझीलंडची टॉप ऑर्डर पाडत बनवले World Cup मध्ये बळींचे अर्धशतक
BREAKING: पाकिस्तानला मिळाले दोन नवे कर्णधार, World Cup मधील अपयशानंतर झाला बदल