वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी खराब राहिली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. बुधवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी बाबर आझम याने तिन्ही प्रकारच्या संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नव्या कर्णधारांच्या नावाची घोषणा केली आहे. बाबरच्या जागी आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा संघाचे नेतृत्व करेल. तर, कसोटी संघाचा कर्णधार म्हणून शान मसूद याच्याकडे जबाबदारी दिली गेली आहे.
Presenting our captains 🇵🇰@shani_official has been appointed Test captain while @iShaheenAfridi will lead the T20I side. pic.twitter.com/wPSebUB60m
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 15, 2023
पाकिस्तान संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी राजीनामा दिला होता. तर पीसीबीने निवड समिती बरखास्त केली होती. शाहिद आफ्रिदी याला नवा निवड समिती अध्यक्ष म्हणून घोषित केलेले. तर युनूस खान याला फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर बाबरला कर्णधार पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
(PCB Appointed Shaheen Afridi And Shan Masood As Captain Of Limited Overs And Test Respectively)
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Semi Final: गिलने अर्धशतक ठोकताच गगनात मावेनासा झाला आई-वडिलांचा आनंद