विश्वचषक 2023 मधील पहिला उपांत्य सामना भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकुन भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाने भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली. या सामन्यात सलामीवीर शुबमन गिल 79 धावांवर असताना स्नायूंच्या दुखापतीमुळे बाहेर गेला.
सामना पाहण्यासाठी संघातील खेळाडूंचे कुटुंबीयही मैदानात उपस्थित राहिले आहेत. शुबमन गिल (Shubman Gill) मैदानावर चांगले फटके मारत होता त्याचा आनंद त्याचे कुटुंबीय घेतानाचा एक व्हिडीओ सारा तेंडुलकर या अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात भारतीय सलामीर फलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक फलंदाजी करत संघाला चांरली सुरूवात करून दिली. 47 धावा करून तो टीम साऊथीच्या गोलंदाजीवर केन विलियमसनला झेल देऊन बाद झाला.
Shubman Gill making his parents & Team India🇮🇳 PROUD 👏 #INDvsNZ pic.twitter.com/xoFodZtqZj
— Sara Tendulkar (@SaraTendulkar__) November 15, 2023
या विश्वचषकात भारतीय संघ आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. भारताने साखळी फेरीत 9 पैकी 9 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सध्या भारताचा सध्याचा फाॅर्म पाहता भारतीय संघ विश्वचषक जिंकेल अशा चाहत्यांना आशा आहेत. (Semi Final As soon as Gill scored a half century the joy of parents was in the sky watch the video)
म्हत्वाच्या बातम्या
एकमेवाद्वितीय विराट! सचिनच्या साक्षीने घातली विश्वविक्रमी 50 व्या वनडे शतकाला गवसणी
CWC 23 : 48 वर्षांच्या विश्वचषक इतिहासात न बनलेला विक्रम, 2023मध्ये बनला; पहिल्यांदाच…