भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने त्याला संपूर्ण जग ‘रनमशीन’ का म्हणते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत विराट कोहली 50वे वनडे अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाला आहे. त्याने भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील मुंबईतील वानखेडे स्टेडिअम येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात हे विश्वविक्रमी शतक केले. विराटने हे शतक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यापुढे मारले. या शतकासह सचिनचा विक्रमही मोडला गेला. विराटच्या शतकावर संपूर्ण स्टेडिअममध्ये उपस्थित चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही उभे राहून टाळ्या वाजवल्या. यात अनुष्का शर्मा हिच्या रिऍक्शनने सर्वांचे लक्ष वेधले. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.
विराट कोहलीचे शतकांचे अर्धशतक
रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने मैदानात पाऊल ठेवले. तिसऱ्या क्रमांकावरील विराट मैदानात आल्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे संथ सुरुवात केली. मात्र, त्याने जसजसा खेळ पुढे गेला, तसा आपला वेग वाढवला. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करत शतक ठोकले. त्याने यावेळी 113 चेंडूंचा सामना करताना 117 धावांची झंझावाती शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 50वे शतक ठरले.
विराटने शतक ठोकताच स्टेडिअममधील प्रेक्षकांव्यतिरिक्त सेलिब्रिटींनीही उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कलाकार कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहिद कपूर, मीरा राजपूत, जॉन अब्राहम आणि माजी दिग्गज फुटबॉलपटू डेविड बेकहॅम यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, या सर्वांमध्ये अनुष्का शर्मा हिच्या रिऍक्शनने लक्ष वेधले. तिने विराटला तीनपेक्षा जास्त वेळा फ्लाईंग किस दिल्या. त्यावर विराटनेही तिला फ्लाईंग किस दिली.
A flying kiss by Anushka Sharma when Kohli completed his 50th ODI hundred. 🐐 pic.twitter.com/V2XrLFT8gI
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
Anushka Sharma was trolled and targeted when @imVkohli was out of form.
Just Look at her happiness now as Kohli writes his name into history books.@AnushkaSharma
— Nabeel Hashmi (@iNabeelHashmi) November 15, 2023
🥹🤌🏻❤️#ViratKohli𓃵 #AnushkaSharma pic.twitter.com/x9lknUnlNL
— 𝓒𝓻𝔂𝓼𝓽𝓪𝓵 🔮 (@crisiscrystall) November 15, 2023
सचिनचा विक्रम तुटला
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता. त्याने 49 शतके केली होती. मात्र, आता हा विक्रमही विराटने आपल्या नावे केला आहे. विराट कोहली हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. त्याने 50 शतकांचा विक्रम आपल्या नावावर केला.
याव्यतिरिक्त विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात शतक करण्याचा विक्रम आतापर्यंत फक्त सौरव गांगुली याच्याच नावावर होता. मात्र, आता विराट (117) आणि श्रेयस अय्यर (105) या दोघांची नावेही त्यात सामील झाली आहेत. (virat kohli 50th odi century celebration and sachin tendulkar anushka sharma reaction see video)
हेही वाचा-
एकमेवाद्वितीय विराट! सचिनच्या साक्षीने घातली विश्वविक्रमी 50 व्या वनडे शतकाला गवसणी
विराटने 20 वर्षानंतर बदलला इतिहास! मिळवला World Cup मधील सर्वात यशस्वी फलंदाजाचा बहुमान