---Advertisement---

CWC Prize Money: फायनलची संधी हुकली, पण न्यूझीलंड-आफ्रिकेवर पैशांचा पाऊस; कमावले पाकिस्तानपेक्षाही जास्त

South-Africa-And-New-Zealand-Prize-Money
---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची उपांत्य फेरी संपली आहे. तसेच, 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 अंतिम सामना खेळण्यासाठी दोन संघ निश्चित झाले आहेत. ते संघ म्हणजेच, भारत आणि ऑस्ट्रेलिया होय. दुसरीकडे, उपांत्य सामन्यात पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडणारे संघ म्हणजे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका होय. स्पर्धेतून बाहेर पडले असले, तरीही या दोन संघावर पैशांचा पाऊस पडला आहे. दोन्ही संघ मालामाल झाले आहेत. चला तर, त्यांना मिळालेली विश्वचषक 2023 प्राईज मनी किती जाणून घेऊयात…

कुणाला किती रुपये?
भारतात आयोजित विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धा सुरू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी आयसीसीने प्राईज मनीची घोषणा केली होती. त्यात सांगण्यात आले होते की, साखळी फेरीतून बाहेर होणाऱ्या संघांना जवळपास 83-83 लाख रुपये मिळतील. तसेच, साखळी फेरीत संघाला प्रत्येक विजयासाठी 33 लाखांहून अधिक रुपये मिळतील. पाकिस्तानने साखळी फेरीत 4 सामने जिंकले होते. अशाप्रकारे त्यांना 83 लाखांव्यतिरिक्त 1 कोटी 32 लाख रुपये मिळतील. एकूणच पाकिस्तान संघाने जवळपास 2 कोटी 15 लाख रुपये घेऊन स्पर्धेचा निरोप घेतला.

उपांत्य फेरीतून बाहेर होणाऱ्या संघांना किती मिळणार?
आयसीसीने त्यांच्या निवेदनात घोषणा केली होती की, उपांत्य फेरीतून (Semi Final Prize Money) बाहेर होणाऱ्या दोन संघांना प्रत्येकी जवळपास 6.63 कोटी रुपये दिले जातील. न्यूझीलंड संघ उपांत्य सामन्यात भारताकडून पराभूत होऊन बाहेर पडला. तसेच, दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) संघात इडन गार्डन्स मैदानावर दुसरा उपांत्य सामना (Semi Final 2) खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्यामुळे आता न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेला प्राईज मनी (Prize money to New Zealand and South Africa) म्हणून प्रत्येकी 6.63 कोटी रुपये मिळतील. तसेच, त्यांना साखळी फेरीतील प्रत्येक विजयासाठी 33.17 लाख रुपये अधिकचे मिळतील.

अंतिम सामना जिंकणाऱ्या संघावर पैशांचा पाऊस
विश्वचषक 2023 प्राईज मनी (World Cup 2023 Prize Money) पाहायची झाली, तर एकूण रक्कम 82.93 कोटी रुपये इतकी आहे. यातील सर्वात मोठी बक्षीस रक्कम अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला मिळेल. याची रक्कम 40 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 33.17 कोटी रुपये मिळतील. तसेच, पराभूत होणाऱ्या संघाला जवळपास 16.58 कोटी मिळतील. त्यासोबतच प्रत्येक विजयासाठी 33.17 लाख रुपये वेगळे मिळतील.

भारतीय संघ (Team India) अंतिम सामन्यात पोहोचला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ साखळी फेरीत आणि उपांत्य सामन्यात अजिंक्य राहिला. जर भारतीय संघ विजयी झाला, तर बक्कळ कमाई करेल. (how many rupees new zealand and south africa cricket team earn in world cup 2023 prize money know here)

हेही वाचा-
टीम इंडियासाठी वाईट बातमी! ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर होऊ शकतो ‘हा’ पठ्ठ्या
Semi Final 2: ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजयानंतर कमिन्सचे मोठे विधान; म्हणाला, ‘काही तास भीती वाटली…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---