भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात पराभूत होऊन आता आठवडा होत आला आहे. मात्र, या पराभवाचे घाव अजूनही चाहत्यांच्या हृदयावर आहेत. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक अंतिम सामन्यात भारताचा 6 विकेट्सने दारुण पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकाचा किताब नावावर केला होता. मात्र, ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने विश्वचषकाचे सेलिब्रेशन केले, त्याविषयी जगभरात वाद सुरू आहेत. तो खेळाडू इतर कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श आहे.
विश्वचषक 2023 (World Cup 2023) जिंकल्यानंतर मिचेल मार्श (Mitchell Marsh) याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोत मिचेल मार्श विश्वचषक ट्रॉफीवर पाय (Mitchell Marsh Feet On World Cup Trophy) ठेवून बसल्याचे दिसत आहे. तसेच, त्याच्या हातात एक बीयरदेखील आहे. मात्र, ट्रॉफीवर पाय ठेवल्यामुळे त्याने ट्रॉफीचा अपमान केल्याचे बोलले जात आहे. मिचेलच्या या कृतीमुळे चाहते त्याच्यावर टीकास्त्र डागत आहेत. अशात विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने मार्शच्या या कृत्यावर मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला शमी?
खरं तर, भारतीय संघाचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मिचेल मार्शच्या विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवण्याच्या फोटोविषयी वक्तव्य केले. शमीला ते कृत्य अजिबात आवडले नव्हते. तो म्हणाला, “मी दु:खी आहे, त्या ट्रॉफीवर पाय ठेवणे, ज्याच्यासाठी सर्व संघ खेळतात, ज्या ट्रॉफीला तुम्ही उंचावण्याचे स्वप्न पाहता. या गोष्टीने मला बिल्कुलही खुश केले नाहीये.”
https://twitter.com/RealCricPoint/status/1727721196740018526
सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता शमी
अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विश्वचषक 2023 (Mohammed Shami World Cup 2023) स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. त्याला सुरुवातीच्या 4 सामन्यांसाठी संघातून बाहेर बसवले होते. मात्र, जेव्हा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर पडला, तेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये शमीला जागा मिळाली. शमीने पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथे खेळला होता.
शमीने संधी मिळाल्यानंतर त्याचे सोने करत पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. त्याने विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अवघ्या 7 सामन्यात शमीने 10.70च्या सरासरीने आणि 5.26च्या इकॉनॉमी रेटने सर्वाधिक 24 विकेट्स नावावर केल्या. ही स्पर्धा त्याच्यासाठी खूपच खास ठरली. (Indian pacer mohammed shami statement on mitchell marsh resting foot world cup trophy)
हेही वाचा-
धक्कादायक! दिग्गज टेनिसपटूचे लज्जास्पद कृत्य, एक्स गर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये लावला Hidden Camera, जगभर चर्चा
“त्याला शिकवण्याची गरज नाही”, रोहितला लक्ष्य करणाऱ्यांवर अश्विन संतापला