---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका गाजवणारा ‘हा’ भारतीय गोलंदाज, आता मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळण्यास सज्ज

On: मंगळवार, मार्च 30, 2021 8:38 AM
---Advertisement---

रविवारी (२८ मार्च) पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे. या मालिकेत भारतीय संघातील युवा खेळाडूंचा दबदबा होता. तसेच अवघ्या काही दिवसांनंतर भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खेळाडूंनी देखील सरावासाठी हजेरी लावली आहे. त्यामुळे वनडे मालिका गाजवणारा भारतीय खेळाडू इंग्लंडचा आणि केकेआरचा कर्णधार ऑएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली दिग्गज फलंदाजांच्या त्रिफळा उडवताना दिसणार आहे.

येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. अशातच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत पदार्पण करणारा भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा देखील आयपीएल २०२१ खेळण्यास सज्ज झाला आहे. तो आयपीएलच्या केकेआर संघाचा भाग आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांविरुद्ध खेळणारे हे खेळाडू आता एकत्र खेळणार आहेत.

सोमवारी ऑएन मॉर्गन, शुबमन गिल, प्रसिद्ध कृष्णा आणि इतर खेळाडू आगामी आयपीएल स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाशी जोडले गेले आहेत. या खेळाडूंना एका आठवड्यासाठी विलग्नवसात राहावे लागणार आहे. प्रसिद्ध कृष्णाबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी करणारा भारतीय फलंदाज शुबमन गिल देखील याच संघातून खेळताना दिसणार आहे.

रविवारी कोलकाता संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मैक्कुलम यांनी देखील संघात उपस्थिती नोंदविली आहे. याबाबतची माहिती कोलकाता संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देण्यात आली आहे. सोशल मीडियावर फोटोज् शेअर करण्यात आले होते. ज्यामध्ये प्रसिद्ध कृष्णा, ऑएन मॉर्गन आणि शुबमन गिल दिसून येत आहेत. कोलकाता संघाचा पहिला सामना ११ एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद संघासोबत होणार आहे.

आयपीएल २०२१ साठी कोलकाता नाइट रायडर्स संघ

ऑएन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसल, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नीतीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुबमन गिल, सुनील नरेन, पेंट कमिंस, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, टिम सीफर्ट, शाकिब अल हसन , शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडचा भारत दौरा संपल्यानंतर कुठे पोहोचला कोहली? ‘या’ दिवशी होणार आरसीबीत सहभागी

केकेआर आणि आरसीबी या दोन संघांसाठी आयपीएलमध्ये खेळलेले ३ दिग्गज खेळाडू 

इंग्लंडचे असे ३ खेळाडू ज्यांनी आयपीएल खेळले आहे, पण तुम्हाला कदाचित त्यांच्याबद्दल माहितीही नसेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---