देशांतर्गत क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. दुलीप ट्रॉफी 2023-24 हंगामासाठी उत्तर प्रदेश संघाकडून खेळणारा भारतीय वेगवान गोलंदाज शिवम मावी याच्या खांद्यावर नवीन जबाबदारी आली आहे. मावी 28 जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सेंट्रल झोनचे नेतृत्व करणार आहे. उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या मावीने 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, मावीव्यतिरिक्त सेंट्रल झोन संघात आयपीएल 2023 हंगाम गाजवणारा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज रिंकू सिंग याचाही समावेश करण्यात आला आहे. रिंकूही उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.
याव्यतिरिक्त आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा स्टार फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) याचीही सेंट्रल झोन (Central Zone) संघात सामील झाला आहे. जुरेल आयपीएलमध्ये चांगल्या लयीत दिसला होता. त्याने राजस्थानसाठी महत्त्वाच्या खेळी साकारल्या होत्या. त्याच्या नावावर 2023 हंगामातील 13 सामन्यात 21.71च्या सरासरीने 152 धावा केल्या आहेत.
रिंकू सिंगने आयपीएलमध्ये केली धमाल, तर मावी बाकावर
आयपीएल 2023 हंगामात केकेआर संघासाठी रिंकूने चमकदार कामगिरी केली होती. त्याने गुजरात टायटन्स संघाविरुद्धच्या अखेरच्या षटकात यश दयालच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार मारत वाहवा लुटली होती. त्यानंतरही त्याने संघासाठी अनेक शानदार खेळी साकारल्या. रिंकूने 14 सामन्यात 59.25च्या सरासरीने आणि 149.53च्या स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 4 अर्धशतकांचाही पाऊस पाडला होता.
Central Zone Team for Duleep Trophy! Ready to Perform in the tournament and bring the cup home this season!!#UnstoppableUP #UPCA pic.twitter.com/aFspk6Ka8B
— UPCA (@UPCACricket) June 11, 2023
तसेच, गुजरात टायटन्स संघाचा भाग असलेला शिवम मावी आयपीएल 16 (IPL 16) हंगामातील एकही सामना खेळला नव्हता. मावीला गुजरातने 6 कोटी रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते. त्याने आतापर्यंत 12 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोन संघ
शिवम मावी (कर्णधार), विवेक सिंग, हिमांशू मंत्री, कुणाल चंदेला, शुभम शर्मा, अमनदीप खरे, रिंकू सिंग, अक्षय वाडकर, उपेंद्र यादव (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, सौरभ कुमार, मानव सथर, सारांश जैन, आवेश खान, यश ठाकूर.
दुलीप ट्रॉफीने देशांतर्गत हंगामाला सुरुवात
दुलीप ट्रॉफीमार्फत 2023-24 भारतीय देशांतर्गत हंगामाला सुरुवात होईल. दुलीप ट्रॉफीत एकूण 6 झोनचे संघ सहभागी होतील. या स्पर्धेची सुरुवात 28 जूनपासून होईल, तर शेवटचा सामना 16 जुलै रोजी खेळला जाईल. मात्र, अद्याप स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले नाहीये. (indian pacer shivam mavi will captain the central zone in 2023 24 duleep trophy kkr rinku singh also in squad)
महत्वाच्या बातम्या-
‘भारतीय फलंदाजांना बाबर आझमकडून शिकण्याची गरज…’, पराभवानंतर माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान
आपलं गाऱ्हाणं सोशल मीडियावर मांडणं शुबमनच्या अंगलट, आयसीसीने दिली मोठी शिक्षा; लगेच वाचा