टी२० क्रिकेटचा विश्वचषक यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी सगळ्याच संघाची जोरदार तयारी सुरू आहेत. भारतीय संघही याबाबतीत मागे नाही. भारतीय संघ सध्या या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून अधिक टी२० सामने खेळत आहेत. भारत ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अजून एक टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकांमध्ये जे खेळाडू उत्तम कामगिरी करतील त्यांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी द्यावी अशी चर्चा माजी खेळाडूंमध्ये सुरू आहे. त्यातच भारताचा दिग्गज खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याने त्याचा अंतिम अकराचा संघ निवडला आहे.
इरफानने या अकरा खेळाडूंमध्ये यष्टीरक्षकाची निवड करताना रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांपैकी कोणा एकालाच संघात जागा दिली आहे. आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) नंतर कार्तिकने भारतीय संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यातच त्याने माजी खेळाडूंंच्या अंतिम अकरामध्ये स्थान देखील मिळवले आहे. इरफानने पंतला वगळून कार्तिकची टी२० विश्वचषक २०२२च्या अंतिम अकरामध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवड केली आहे.
इरफानने तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहली (Virat Kohli) याला कायम ठेवले आहे. सध्या कोहलीची कामगिरी निराशाजनक असली तरी ऑस्ट्रेलियामध्ये तो चमकदार कामगिरी करू शकतो. यामुळे अंतिम अकरामध्ये त्याचे स्थान पक्केच आहे, असे मत व्यक्त केले आहे
इरफानने विराट बरोबरच रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनाही संघात जागा दिली आहे. मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांची निवड केली आहे. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्याला संघात घेतले आहे. त्याने निवडलेल्या अंतिम अकराचा क्रम पााहता रविंद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांनाही संघात स्थान दिले आहे.
इरफान पठानचा टी२० विश्वचषक २०२२चा अंतिम अकरा जणांचा संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-२० विश्वचषकात संधी मिळण्यासाठी युवा खेळाडूंचे पारडे ठरतयं जड, रोहित-विराटचं टेंशन वाढणार?
INDvsSA T20: पावसामुळे रद्द झालेल्या सामन्याच्या तिकिटाची रक्कम मिळणार परत, जाणून घ्या किती ते
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इशान किशनचे द्विशतकी योगदान, ‘हे’ आहेत सर्वाधिक धावा करणारे पाच खेळाडू





