ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकामध्ये (T20 World Cup)भारताची सुरूवात उत्तम झाली. पाकिस्तानवर मिळवलेल्या पहिल्या विजयाने भारताने दुसऱ्या सामन्यासाठी लगेच सरावाला सुरूवात केली. भारतीय संघाने मंगळवारी (26 ऑक्टोबर) कसून सराव केला. सरावानंतर त्यांच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये जे दिले गेले, त्यावर खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याला कारणही तसेच होते.
या स्पर्धेत सराव सत्रानंतर जवळपास सर्व संघांना एकाच प्रकारचे जेवण दिले जाते, मात्र भारतीय खेळाडूंबाबत तसे झाले नाही. बीसीसीआयच्या सुत्रानुसार, कडक सरावानंतर खेळाडूंला गरम जेवण मिळणे आवश्यक आहे, जे त्यांना मिळाले नाही. भारताचे हे अभ्यास सत्र पर्यायी होते. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर आणि दीपक हुड्डा यांनी भाग घेतला, तर हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांना आराम दिला गेला. तसेच बीसीसीआयने काही बाबींच्या तक्रारी आयसीसीकडे केल्या आहेत.
त्यातील पहिली आणि महत्वाची तक्रार म्हणजे सरावानंतर खेळाडूंच्या जेवणामध्ये फळांसोबत सॅंडविच आणि मेक युवर सॅंडविच असा प्रकार होता जे भारतीय खेळाडूंना अजिबात आवडले नाही. दुपारच्या सरावानंतर खेळाडूंना संपूर्ण जेवण मिळेल अशी अपेक्षा होती. यावरून बीसीसीआयच्या सुत्राने म्हटले, “हे खूपच विचित्र झाले. काही खेळाडूंनी फळे खाल्ली, मात्र दुपारची वेळ असल्याने प्रत्येकजण जेवण करू इच्छित होता आणि त्यामुळेच त्यांनी हॉटेलवर परतल्यावर जेवण केले. ते जेवणही थंड आणि खाण्यायोग्य नव्हते असेही काहींही म्हटले.”
सिडनीच्या ब्लॅकटाऊनमध्ये भारताला सराव करण्याची परवाणगी दिली होती. भारताचे हे सरावाचे ठिकाण हॉटेलपासून 42 किमी अंतरावर आहे. यामुळे भारताने सराव करण्यास नकार दिला. संघाने सरावाचे ठिकाण आणि दिले जाणारे जेवण याची तक्रार आयसीसीकडे केली.
आयसीसीच्या सुत्राने म्हटले, “टी20 विश्वचषकातील सर्वच संघाच्या जेवणाचे मेन्यू एकसारखेच आहे. खेळाडूंना दिलेल्या हॅंडबूकमध्ये ते सर्व स्पष्ट केले आहे. काही खेळाडूंना यावर आपत्ती असेल तर त्यांनी ती सांगावी. बीसीसीआयकडून अजून अशा कोणत्याच अधिकृत प्रकारची तक्रार आली नाही. आली तर त्यावर आम्ही बरोबर प्रतिक्रिया देऊ.”
भारताचा पुढील सामना 27 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडवर नेदरलॅंड्स विरुद्ध आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“अर्शदीप झहीरप्रमाणे भारतीय क्रिकेटसाठी योगदान देईल”; माजी कर्णधाराने व्यक्त केला आशावाद
टीम इंडिया कशी करणार सेमी फायनलपर्यंतचा प्रवास? अशी असतील एकूण समीकरणे