भारतातील देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात दुलीप ट्रॉफीनं होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना (5 सप्टेंबर) रोजी होणार आहे. तर शेवटचा सामना (22 सप्टेंबर) रोजी खेळला जाणार आहे. त्याचबरोबर यावेळची दुलीप ट्रॉफी चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. कारण, यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादवसारखे मोठे खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आपण कोहली शेवटची दुलीप ट्राॅफी कधी खेळला होता हे जाणून घेऊया.
विराट कोहली (Virat Kohli) 12 वर्षांपूर्वी अखेरचा देशांतर्गत क्रिकेट खेळला होता. हा दिग्गज फलंदाज अखेर नोव्हेंबर 2012 मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळला होता. हा सामना दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यात झाला. गाझियाबादच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आले. त्याचवेळी, या सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) दोन्ही डावांसह 57 धावा केल्या होत्या. यानंतर विराट कोहली (Virat Kohli) देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला नाही.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 145 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 50.21च्या सरासरीनं फलंदाजी करताना 11,097 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कोहलीनं 38 अर्धशकांसह 36 शतक झळकावली आहेत.