क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक विक्रम पहिले असतील, जे तोडणे अशक्य आहे. असे अनेक फलंदाज आहेत जे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हिट ठरले आहेत; तर आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये फ्लॉप. असाच एक दिग्गज खेळाडू होऊन गेला, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अवघ्या ३ सामन्यात ३० गडी बाद केले होते. परंतु त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला होता. हा कारनामा माजी भारतीय खेळाडू पुतु चौधरी यांनी केला होता.
पुतू चौधरी ज्यांचे खरे नाव निरोध रंजन चौधरी असे होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या ३ सामन्यात ३० गडी बाद केले होते. पुतु चौधरी यांचा जन्म २३ मे १९२३ मध्ये झारखंड (त्यावेळी बिहार) मध्ये झाला होता. या खेळाडूने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात बिहार संघातून केली होती. परंतु त्यानंतर त्यांनी बंगाल संघासाठी काही काळ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी बिहार संघाकडून खेळायला सुरुवात केली होती.
पुतु चौधरी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. सुरुवातीच्या ३ सामन्यात त्यांनी ३० गडी बाद केले होते. या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. याच कामगिरीच्या जोरावर त्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. परंतु भारतीय संघात ते पूर्णपणे फ्लॉप ठरले होते.
त्यांनी १९४४ -४५ मध्ये बंगाल गवर्नर इलेव्हन संघाविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हॅट्रिक घेतली होती. यात भारतीय संघासाठी खेळलेले दिग्गज फलंदाज विनू मांकड, लाला अमरनाथ आणि सैयद मुश्ताक अली यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. परंतु भारतीय संघासाठी खेळताना त्यांना पहिल्या दोन सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यांनी २ सामन्यात केवळ १ गडी बाद केला होता. यावेळी त्यांची गोलंदाजी सरासरी २०५ इतकी होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने छाप सोडण्यास अपयशी ठरलेल्या पुतू चौधरी यांनी क्षेत्ररक्षण मात्र दमदार केले होते. त्यांनी वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज फलंदाज एवटर्न विक्स याला धावबाद करत माघारी धाडले होते. त्यावेळी विक्स ९० धावांवर फलंदाजी करत होता. विक्सने १ धाव घेण्यासाठी गलीच्या दिशेने शॉट खेळला होता. तेव्हा गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेल्या पुतू चौधरी यांनी यष्टीरक्षकाकडे वेगवान थ्रो करत विक्सला माघारी धाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ईडन गार्डन माझं होम ग्राउंड…’, जिथे बॅट धरायला शिकला, त्याच मैदानाबद्दल काय बोलून गेला साहा
Video: १८८च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारी फलंदाज एका धावेच्या नादात रनआऊट, पाहा तो दुर्देवी क्षण
पूजा वस्त्राकारचा भेदक मारा अन् स्म्रीतीच्या टीमच्या धडाधड पडल्या विकेट्स, नावे केला मोठा रेकॉर्ड