---Advertisement---

पूजा वस्त्राकारचा भेदक मारा अन् स्म्रीतीच्या टीमच्या धडाधड पडल्या विकेट्स, नावे केला मोठा रेकॉर्ड

On: सोमवार, मे 23, 2022 11:44 PM
Pooja-Vastrakar
---Advertisement---

ट्रेलब्लेझर्सविरुद्ध सोमवारी (२३ मे) झालेल्या महिला टी२० चॅलेंज २०२२ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाजने ४९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सुपरनोव्हाजकडून वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकार हिने मॅच विनिंग खेळ दाखवला. तिने भेदक गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोठा हातभार लावला. दरम्यान तिने विक्रमी कामगिरीही आपल्या नावावर केली आहे.

पूजाने (Pooja Vastrakar) या सामन्यादरम्यान केवळ १२ धावा देत ४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. यासह ती महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करणारी तिसरीच गोलंदाज (Best bowling figures in Women’s T20 Challenge) ठरली आहे. 

सुपरनोव्हाजच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेलब्लेझर्सचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. यात पूजाचे सर्वात मोठे योगदान राहिले. तिने आपल्या कोट्यातील ४ षटके टाकताना फक्त १२ धावा देत ट्रेलब्लेझर्सच्या ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्म्रीती मंधानाला पूजाने प्रिया पूनियाच्या हातून झेलबाद केले. स्म्रीती ३४ धावांवर बाद झाली. त्यानंतर हिली मॅथ्यूज पूजाच्या जाळ्यात अडकली. हिलीला पूजाने तानिया भाटीयाच्या हातून झेलबाद केले. तसेच सोफी डंकले आणि सलमा खातून यांचीही तिने विकेट काढली.

अशाप्रकारे फक्त १२ धावा खर्च करत ४ विकेट्स घेत पूजाने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी नोंदवली आहे. याबरोबरच ही महिला आयपीएलमधील कोणत्या गोलंदाजाची तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी राहिली आहे. पूजापूर्वी सोफी एक्लेस्टोन आणि राधा यादव यांनी हा पराक्रम केला आहे.

महिला टी२० चॅलेंजमधील सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी:
५/१६ – राधा यादव विरुद्ध ट्रेलब्लेझर्स (२०२०)
४/९ – सोफी एक्लेस्टोन विरुद्ध वेलोसिटी (२०२०)
४/१२ – पूजा वस्त्राकर विरुद्ध ट्रेलब्लेझर्स (२०२२)*

दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजने निर्धारित २० षटकात सर्वबाद १६३ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजकडून कर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक ३७ धावा केल्या. २९ चेंडू खेळताना ४ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. तिच्याबरोबरच हरलीन डेओल (३५ धावा), सलामीवीर डिएंड्रा डॉटिन (३२ धावा) आणि प्रिया पुनिया (२२ धावा) यांनीही चांगल्या खेळी खेळत संघाचा धावफलक पुढे नेला. प्रत्युत्तरात ट्रेलब्लेझर्सचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्यांना ११४ धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

हरमनप्रीतच्या सुपरनोव्हाजने स्म्रीतीच्या ट्रेलब्रेझर्सची केली पळता भुई थोडी, ४९ धावांनी जिंकला सामना

टीम इंडियात निवड न झाल्याने नितीश राणाने व्यक्त केले दु:ख, ट्वीट करत केले मोठे विधान

बड्या लोकांचे, बडे छंद! विमान प्रवासातही अश्विनचा रंगला बुद्धिबळचा खेळ, Video बघा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---