इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. आयपीएल २०२१ आतापर्यंत, झालेल्या १२ सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून आला आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते तर सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. या शर्यतीत टॉप ५ खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला दिसून येत आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. हे खेळाडू आपल्या प्रदर्शनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत ५ पैकी चार खेळाडू हे भारतीय खेळाडू आहेत. यापेक्षा ही महत्वाची बाब म्हणजे २ खेळाडू असे आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाहीये. हर्षल पटेल आणि आवेश खान यांनी या हंगामात उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. तसेच या यादीत राहुल चाहर देखील आहे ज्याने भारतीय संघासाठी ३ टी -२० सामने खेळले आहेत. या यादीत सर्वोच्च स्थानी हर्षल पटेल आहे. ज्याने आतापर्यंत ९ गडी बाद केले आहेत.
तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत, दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामी फलंदाज २३१ धावा करत सर्वोच स्थानी आहे. तर या शर्यतीत एकमेव परदेशी खेळाडू आहे ज्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. तुफानी फटकेबाजी करत ग्लेन मॅक्सवेल हा १७६ धावा करत, या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील १२ सामने झाले आहेत. येणाऱ्या सामन्यांमध्ये या क्रमवारीत भरपूर बदल पाहायला मिळू शकतात.
ऑरेंज कॅप ( टॉप ५ फलंदाज) –
१) शिखर धवन (दिल्ली कॅपिटल्स) : २३१ धावा
२) ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) : १७६ धावा
३) जॉनी बेअरिस्टो (सनरायझर्स हैद्राबाद) : १७३ धावा
४) फाफ ड्यू प्लेसिस (चेन्नई सुपर किंग्ज) : १६४ धावा
५) नितीश राणा (कोलकाता नाईट रायडर्स) : १६४ धावा
पर्पल कॅप (टॉप ५ गोलंदाज ) –
१) हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) : ९ गडी
२) दीपक चाहर (चेन्नई सुपर किंग्ज) : ८ गडी
३) आवेश खान (दिल्ली कॅपिटल्स) : ८ गडी
४) राहुल चाहर (मुंबई इंडियन्स) : ८ गडी
५) आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स) : ७ गडी
महत्वाच्या बातम्या:
पॅट कमिन्सने सॅम करनला एकाच षटकात ठोकल्या ३० धावा, गेल-रैना-कोहली यांच्या पंक्तीत मिळवले स्थान
व्हिडिओ : राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूने केली बुमराह, अश्विन आणि भज्जीच्या गोलंदाजीची नक्कल
अखेर प्रतिक्षा संपली! धोनीने मारला यंदाच्या हंगामातील पहिला षटकार, पाहा व्हिडिओ