बुधवारी हाँगकाँगसोबतच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी दुबईत मस्ती केली. रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आदी खेळाडू स्पीडबोटवर दिसले, तर सूर्यकुमार यादव कुटुंबासह दुबईला पोहोचला. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला होता. हाँगकाँगसोबतचा हा भारताचा ग्रुप स्टेजमधील दुसरा आणि शेवटचा सामना आहे. भारताची विजयाची टक्केवारी खूप जास्त आहे, त्यामुळे भारत सुपर4 मध्ये पोहोचेल हे निश्चित मानले जात आहे.
https://www.instagram.com/p/Ch4VzJIJ0NN/?utm_source=ig_web_copy_link
या सामन्यापूर्वी रवी बिश्नोईने काही फोटो शेअर केले, त्यात खेळाडूंनी स्पीडबोटवर एन्जॉय केल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबत हरप्रीत ब्रार आणि अर्शदीप सिंग दिसले. अर्शदीप सिंग पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग होता आणि तो हाँगकाँगविरुद्धही खेळणार आहे. दुसऱ्या सामन्यात रवी बिश्नोईचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो आणि काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
भारत विरुद्ध हाँगकाँग वेळापत्रक
तारीख – 31 ऑगस्ट २०२२
नाणेफेक – 7 PM (भारतीय वेळेनुसार)
सामना सुरू – संध्याकाळी 7:30 (भारतीय वेळेनुसार)
स्टेडियम – दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम
भारताचा आशिया कपसाठीचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मध्यंतरी मी मेल्याच्याही बातम्या आल्या होत्या…’, पत्रकाराला मिळाले भारतीय खेळाडूकडून भन्नाट उत्तर
‘हाँगकाँगचा बाबर’ भारतासाठी ठरणार कर्दनकाळ! नावावर आहे मोठा विक्रम, रोहितही नाही आसपास
‘…आम्हीही चांगलीच टक्कर देऊ शकतो’, भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी हाँगकाँगच्या कर्णधाराची हुंकार