२०२४ टी20 विश्वचषकासाठी जवळपास सर्वच देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. विश्वचषकासाठी भारतीय संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र संघ जाहीर होताच भारतीय खेळाडू फ्लॉप होताना दिसत आहेत. दुसरीकडे विश्वचषक जवळ येत असल्याचं पाहून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मात्र फॉर्ममध्ये परतत आहेत. विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडूंचं फ्लॉप होणं ही मोठी समस्या ठरू शकते.
विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं फॉर्ममध्ये परतणं केवळ भारतासाठीच नाही तर टी२० विश्वचषक खेळणाऱ्या प्रत्येक संघांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. २०२३ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाचं विजेतेपद ऑस्ट्रेलियानं पटकावलं होतं. आता कांगारूंची नजर आगामी टी20 विश्वचषकावर आहे.
भारतीय खेळाडू – टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर संघात निवडलेल्या खेळाडूंचा फ्लॉप शो सुरू झाला. सर्वप्रथम टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप झाला. विश्वचषकासाठी संघाची निवड झाल्यानंतर केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित केवळ ११ धावाच करू शकला. यापूर्वी लखनऊविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधारानं केवळ ४ धावा केल्या होत्या.
याशिवाय टी२० विश्वचषकाची टीम जाहीर झाल्यानंतर संजू सॅमसन, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे शून्यावर बाद झाले आहेत. तर सूर्यकुमार यादवनं लखनौविरुद्ध केवळ 10 धावांची खेळी खेळली होती. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजाही फ्लॉप झाला. तो पंजाबविरुद्ध केवळ २ धावांवर बाद झाला आणि गोलंदाजीत त्याला एकही बळी घेता आला नाही.
ऑस्ट्रेलियन खेळाडू – दुसरीकडे, विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा झाल्यानंतर मिशेल स्टार्क पहिल्यांदाच फॉर्ममध्ये दिसला. आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या केकेआरच्या मिशेल स्टार्कनं मुंबईविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 33 धावांत 4 बळी घेतले.
याशिवाय लखनऊकडून खेळणाऱ्या मार्कस स्टॉयनिसनं मुंबईविरुद्ध ६२ धावांची शानदार खेळी खेळली. तर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असलेल्या पॅट कमिन्सनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार गोलंदाजी करत ३४ धावांत २ बळी घेतले. या सामन्यात धावांचा बचाव करताना त्यानं १९व्या षटकात केवळ ७ धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
कोलकाताविरुद्ध ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून का खेळला रोहित शर्मा? कारण आलं समोर
भुवनेश्वर कुमारनं राजस्थानच्या जबड्यातून हिसकावला सामना, हैदराबादचा शेवटच्या चेंडूवर विजय