भारतीय क्रिकेट संघ सध्या एकदिवसीय आणि टी20 फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन संघ आहे, तर भारतीय संघ कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. यापैकी एक असा फॉरमॅट आहे ज्यामध्ये भारतीय संघ वैयक्तिक खेळाडूंच्या क्रमवारीत मागे पडला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या आयसीसी क्रमवारीमध्ये (ICC Ranking) (टॉप-10) एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.
पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर भारताकडे सध्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel) आणि हार्दिक पंड्यासारखे (Hardik Pandya) जागतिक दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. रवींद्र जडेजा सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे, जो 13व्या स्थानावर आहे. आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे जडेजाशिवाय टॉप-20 अष्टपैलूंच्या यादीत दुसरा कोणताही भारतीय खेळाडू नाही.
या यादीत हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 22व्या स्थानी आहे. तर 50 हून अधिक एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा अक्षर पटेल (Axar Patel) टॉप-50 मध्येही नाही. या यादीत अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू मोहम्मद नबी (Mohammad Nabi) अव्वल स्थानावर आहे.
एकदिवसीय फॉरमॅटमध्ये भारताच्या अष्टपैलू खेळाडूंच्या खराब क्रमवारीचे एक मुख्य कारण म्हणजे 2024 मध्ये भारतीय संघाने केवळ 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. हे 3 एकदिवसीय सामने ऑगस्ट महिन्यात खेळले गेले होते, ज्यामध्ये भारतीय संघाला श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत 2-0 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता.
एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीबद्दल बोलायचे झाले, तर टॉप-10 मध्ये 3 भारतीय फलंदाज आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) (दुसरा), शुबमन गिल (Shubman Gill) (तिसरा) आणि विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या स्थानी आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीबद्दल बोलायचे झाले, तर 3 भारतीय गोलंदाज सध्या टॉप-10 मध्ये आहेत. त्यामध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav) (तिसऱ्या), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) (आठव्या) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) दहाव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
संघाला मोठा झटका! एकदिवसीय मालिकेपूर्वीच स्टार अष्टपैलू बाहेर
IPL 2025; ‘हे’ 3 खेळाडू केकेआरच्या कर्णधार पदासाठी ठरू शकतात दावेदार
बाॅर्डर गावस्कर ट्राॅफीमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे फलंदाज (टाॅप-5)