भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान दोन्ही संघात पहिल्याच दिवशी चुरशीची लढत पाहायला मिळाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताची फलंदाजी पूर्णपणे निष्फळ दिसली. भारताने टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाला, त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला.
भारतीय संघासाठी पहिल्या डावात कसोटी पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) भारतासाठी सर्वाधिक 41 धावा केल्या. दरम्यान त्याने 6 चौकारांसह 1 उत्तुंग षटकार लगावला. पण भारताचे 7 फलंदाज दुहेरी धावांचा आकडा देखील गाठू शकले नाहीत. दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) लवकर बाद झाल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर लिहिले की, “लवकर बाद कर लंडनला जायचंय.” त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाल्या आहेत.
Virat Kohli Australian bowlers se#BGT2024 #INDvsAUS pic.twitter.com/obRCwNAJKi
— Divu Ahir (@Divuahirr) November 22, 2024
— Gagan🇮🇳 (@1no_aalsi_) November 22, 2024
Brilliant plan by Virat Kohli 👍🏻😂#INDvsAUS pic.twitter.com/nbMDl8pXBw
— UmdarTamker (@UmdarTamker) November 22, 2024
पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. दिवसभरात एकूण 17 विकेट्स पडल्या, त्यापैकी 10 विकेट्स भारताच्या तर 7 विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या होत्या. भारतीय संघ 150 धावांवर ऑलआऊट झाला असताना ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने (Josh Hazlewood) सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. याशिवाय मिचेल स्टार्क (Mitchell Starc), मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर पहिल्या डावासाठी फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 67 चेंडूत 7 गडी गमावले. दरम्यान कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) भारतीय संघासाठी सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 2, तर पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाने (Harshit Rana) उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर 1 विकेट आपल्या नावावर केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया 83 धावांनी पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आता या चॅनलवर पाहा आगामी आशिया कपचे सामने, तब्बल इतक्या कोटींचा करार!
भारतीय फलंदाज कसोटीत सातत्यानं फ्लॉप का होत आहेत? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू (टाॅप-5)