---Advertisement---

आयपीएल तर संपली, पण टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! असंच सुरू राहिलं, तर विश्वचषकात होईल पंचायत

On: सोमवार, मे 30, 2022 8:33 PM
Team-India
---Advertisement---

नुकतीच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२चा १५वा हंगाम संपन्न झाला आहे. या हंगामात अनेक नवीन खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत सर्वांनाच प्रभावित केले आहे. असे असताना देखील भारतीय संघात आपले वर्चस्व गाजवणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाची धुरा गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळणाऱ्या या तीन खेळाडूंनी सर्वांना निराश केले आहे.

१. रोहित शर्मा (Rohit Sharma)

 Rohit-Sharma
Photo Courtesy : Instagram/ Rohit Sharma

आयपीएल २०२२ हा मुंबई इंडियन्ससाठी खूप वाईट हंगाम मानला जात आहे. यासोबतच त्यांचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा हंगाम खूप वाईट गेला आहे. या हंगामात रोहितची बॅट शतकापासून तर दूर आहेच, पण एकही अर्धशतक झळकावू शकली नाही. त्याने १४ सामन्यात केवळ १९.१४ च्या सरासरीने फक्त २६८ धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. मात्र, यंदाच्या वर्षी रोहित कोणतीही विशेष कामगिरी करू शकला नाही, त्यामुळेच मुंबईची अशी अवस्था झाली असल्याचंही सांगितलं जात आहे. 

२. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)

Ravindra-Jadeja
Phot Courtesy : Instagram/ Ravindra jadeja

चेन्नई सुपर किंग्जचाअष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाआयपीएल २०२२मध्ये चेन्नईसाठी फ्लॉप ठरला. केवळ फलंदाजीतच नव्हे, तर गोलंदाजीतही तो विशेष काही दाखवू शकला नाही. या मोसमात फलंदाजी करताना जडेजाने १० सामन्यात १९.३३च्या सरासरीने केवळ ११६धावा केल्या, तर गोलंदाजी करताना त्याला केवळ ५ विकेट मिळाल्या. त्याने आपली कामगिरी सुधारण्यासाठी चेन्नईचे कर्णधारपदही सोडले, परंतु असे असूनही तो आपल्या फॉर्ममध्ये परत येऊ शकला नाही. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून प्रचलित असणाऱ्या जडेजाने यंदा अनेक झेल सोडले असल्याचं चित्रही पाहायला मिळाले आहे.

३. विराट कोहली (Virat Kohli)

Virat-Kohli
Photo Courtesy : instagram/ virat Kohli

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. आयपीएल २०२२मध्येही तो त्याच स्थितीत राहिला, येथेही तो फॉर्ममध्ये परत येऊ शकला नाही. कोहलीने या हंगामात भलेही दोन अर्धशतके झळकावली असतील, पण त्याने संथ फलंदाजी करताना संपूर्ण हंगामात धावा केल्या आहेत. विराटने १६ सामन्यात २२.७३च्या सरासरीने ३४१ धावा केल्या आहेत. कामगिरी इतकी वाईट नसली, तरी यंदाच्या हंगामात तीन वेळा विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. ही त्याच्यासाठी आणि भारतीय संघासाठी धोक्याची घंटा असू शकते. 

दरम्यान, या तीनही खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघाचा श्वास मानले जाते. विराट भारतीय संघाचा माजी कर्णधार आहे. रोहित सध्याचा करणधार आहे, तर जडेजा कोणत्याही परिस्थितीत भारतासाठी विशेष खेळी करण्याचे सामर्थ्य असणारा खेळाडू आहे. त्यामुळे भारताला आगामी टी२० विश्वचषक जिंकायचा असल्यास या तिन्ही खेळाडूंनी लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

विश्वासच बसत नाहीये! गुजरातने एकाही सामन्यात केले नाही ‘हे’ काम, तरीही जिंकली ट्रॉफी

ए भावा थांब! अर्ध्यापेक्षा जास्त अवॉर्डचे पैसे एकटा बटलर गेला घेऊन, ‘इतक्या’ वेळा आला स्टेजवर

आयपीएल, बीबीएल की पीएसएल? वाचा राशिद खानची आवडती लीग कोणती

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---