भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 14 नोव्हेंबरपासून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू युएईमधून इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) खेळून आले आहेत. त्यामुळे युएईच्या धीम्या खेळपट्ट्यांवर जवळपास दोन महिने खेळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी सोमवारी(16 नोव्हेंबर) पारंपारिक टेनिस चेंडूने ऑस्ट्रेलियाच्या जीवंत खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सराव केला.
फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलने पुल शॉट मजबूत ठेवण्यासाठी कठोर सराव केला. सोमवारी नेटमध्ये सरावादरम्यान त्याने 18 यार्डावरुन येणाऱ्या चेंडूंचा सामना केला. तथापि, अशा सराव सत्रात आश्चर्य वाटण्यासारखे असे काहीही नाही, कारण खेळाडूंना खेळपट्ट्यांवर उंचावरील चेंडू खेळण्यासाठी सराव करावाच लागतो.
टेनिस रॅकेट वापरुन राहूलने केला सराव
भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये फिरकीपटू आर अश्विन टेनिस रॅकेट वापरताना दिसत आहे. भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा उप-कर्णधार राहुलला तो सराव देत होता. याद्वारे तो राहुलला वेगाने येणारे शॉर्ट चेंडू मारण्यास तयार करीत होता.
How is that for innovation? 😎@ashwinravi99 grabs 🎾 racquet while @klrahul11 faces volleys with his 🏏 #TeamIndia pic.twitter.com/03ZV003SdV
— BCCI (@BCCI) November 16, 2020
राहुल पुल शॉट खेळत चेंडू मैदानावर ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. जे भारतीय कर्णधार विराट कोहली उत्तमरित्या करतो. थोड्या अंतरावरुन टेनिस चेंडूचा सराव करण्याचे मुख्य कारण म्हणजे चेंडू खूप वेगात येतो आणि यामुळे फलंदाजास अधिक चांगला प्रतिसाद मिळतो. जेव्हा सामन्यादरम्यान क्रिकेटचा चेंडू 22-यार्डच्या अंतरावरून येतो तेव्हा फलंदाजास खेळायला आणखी थोडा वेळ मिळतो. जे त्याच्या फायद्याचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या –
…तर स्मिथला कर्णधार म्हणून नेमण्यासाठी फार उशीर होईल, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
ना विराट ना रोहीत हाच पठ्ठ्या टी20 चा सर्वोत्तम खेळाडू; इंग्लंडच्या दिग्गज कर्णधाराकडून कौतुकाची थाप
इरफान पठाण ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या संघाकडून खेळणार क्रिकेट, तेही भारतात नाही तर…
ट्रेंडिंग लेख –
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…