भारत विरुद्ध इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला येत्या ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉकच्या मैदानावरील सामन्याने सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या या मालिकेत एकूण चार कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच चेन्नईत दाखल झाला होता.
मात्र, चेन्नईत आल्यावर कोरोना विषाणूच्या नव्या नियमावलीनुसार क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे, आवश्यक होते. त्यामुळे गेले सहा दिवस हे खेळाडू सराव न करता चेन्नईच्या ‘लीला पॅलेस’ या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. आज हा कालावधी पूर्ण झाल्याने खेळाडूंची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आल्याने आज भारतीय खेळाडू चेपॉकच्या मैदानात उतरलेले दिसले.
बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या खेळाडूंचे फोटो शेअर करत ही माहिती दिली. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू मैदानावर पाहणी करायला उतरलेले दिसले. प्रत्यक्ष सरावाला उद्यापासून म्हणजेच २ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
Out and about at The Chepauk after 6 days of quarantine.#TeamIndia pic.twitter.com/mt7FShNFrb
— BCCI (@BCCI) February 1, 2021
दरम्यान, भारतीय संघासाठी ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. भारताला लॉर्डस येथे होणाऱ्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असल्यास इंग्लंड विरुद्ध दोन विजयांच्या फरकाने मालिका जिंकणे आवश्यक आहे. मात्र जर भारतीय संघ 3-0 अथवा 4-0 ने पराभूत झाला तर भारतीय संघाच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या आशा धुळीस मिळतील. इंग्लंडला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी 3-0 ने विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे ही मालिका अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
महत्वाच्या बातम्या:
अंतिम फेरीत पराभूत झालेल्या बडोद्याचे मनोधैर्य वाढवले पंड्या बंधूंनी, ट्विट करत म्हणाले
भारत आणि इंग्लंड संघातील असे ८ खेळाडू, ज्यांच्यात आहे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता
आणि मार्क टेलर यांनी क्रिकेटचाहत्यांच्या मनात मिळवली जागा!