एकाच वेळी दोन खेळांवर लक्ष केंद्रित करणे कोणत्याही खेळाडूसाठी कठीण काम आहे. त्यामध्ये यश मिळविण्यासाठी दोन्ही खेळांमध्ये एकाग्रता आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. पण भारतीय क्रीडा क्षेत्रातील तीन व्यक्तींनी हे केलं आहे.
तीन भारतीय क्रिकेटपटू ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले त्याशिवाय दुसर्या खेळातही देशाचे प्रतिनिधित्व केले.
या लेखात त्या तीन भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी क्रिकेटबरोबरत अन्य खेळातही भारताचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली.
१. कोटर रामास्वामी (Cotar Ramaswamy)
तमिळनाडूचा अनुभवी क्रिकेटपटू कोटर रामास्वामी यांनी ५३ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यामध्ये २४०० धावा केल्या. वयाच्या ४० व्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पहिल्या कसोटी सामन्यात त्यांनी १०० धावा केल्या. एकूण दोन कसोटी सामन्यात त्यांनी १७० धावा केल्या.
पहिल्या कसोटी सामन्यात त्यांच्या खेळीमुळे इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले. क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त, रामास्वामी यांनी १९२२ मध्ये डेव्हिस चषक, या टेनिस स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. कोटर यांचा जन्म १८९६ मध्ये झाला आणि १९९० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
२. एमजे गोपालन (MJ Gopalan)
माजी क्रिकेटर एम जे गोपालन यांनी ७८ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यांनी फक्त एका कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९३४ मध्ये कोलकाता येथे त्यांनी भारतासाठी कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्या सामन्यात फलंदाजीत १८ धावा करून, गोलंदाजीत १ विकेटही घेतली. पण त्या सामन्यानंतर त्यांना पुन्हा भारताकडून खेळण्याची संधी मिळू शकली नाही.
गोपालन हे क्रिकेट व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून खेळणारे एक चांगले हॉकी खेळाडू होते.
१९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये त्याची निवड भारताच्या हॉकी संघात झाली. योगायोगाने, त्याच वर्षी, त्यांना इंग्लंडच्या दौर्यासाठी भारतीय कसोटी संघातही निवडले गेले. एमजे यांनी क्रिकेट संघासोबत जाण्याचा निर्णय घेतला पण त्यांना अंतिम ११ जणांच्या संघामध्ये संधी मिळाली नाही.
त्यांचा ६ जून १९०९ रोजी चेन्नई मध्ये जन्म झाला आणि त्यांचे २१ डिसेंबर २००३ रोजी निधन झाले.
३. चुनी गोस्वामी (Chuni Goswami)
कोलकाता येथे जन्मलेले चुनी गोस्वामी हे व्यावसायिक फुटबॉलपटू तसेच क्रिकेटपटूही होते. फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आणि १९६८ व १९७२ मध्ये रणजी करंडकातील दोन अंतिम सामन्यात पश्चिम बंगाल संघाचा कर्णधारपद भूषवले.
१९६६ मध्ये वेस्ट इंडीज संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ते भारताकडून खेळले, त्या सामन्यात ८ बळी घेतले. एकूणच त्यांनी ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले त्यात एक शतक आणि ७ अर्धशतकांसह १,५९२ धावा केल्या आणि ४७ बळी घेतले.
१५ जानेवारी १९३८ मध्ये त्यांचा जन्म झाला आणि नुकतेच त्यांचे ३० एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
वाचनीय लेख –
टीम इंडियाला आजपर्यंत मिळालेले ५ सर्वात युवा वनडे कर्णधार
असा व्यक्ती, ज्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड रातोरात मालामाल झाले
वय तर केवळ आकडा! वयाच्या पस्तिशीनंतर कसोटीत पदार्पण करणारे ४ क्रिकेटपटू…