---Advertisement---

१४ धावांवर बाद होऊनही हिटमॅन रोहित शर्माने केला हा मोठा कारनामा

On: शुक्रवार, मार्च 8, 2019 6:24 PM
---Advertisement---

रांची। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(8 मार्च) तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 313 धावा केल्या आहेत आणि भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 314 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवनने 1 धावेवर विकेट गमावली. पण रोहित शर्माने चांगली सुरुवात केली होती. मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही त्याने 14 चेंडूत 14 धावा करत विकेट गमावली. असे असले तरी रोहितने एक खास विक्रम केला आहे.

रोहितने केलेल्या 14 धावांच्या खेळीत त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यामुळे रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 षटकारांचा टप्पा गाठला आहे.

हा टप्पा पार करणारा तो माजी कर्णधार एमएस धोनीनंतरचा दुसराच भारतीय क्रिकेटपटू आहे. काही दिवसांपूर्वीच धोनीने 350 षटकारांचा टप्पा पार केला होता. तसेच हा टप्पा पार करणारा रोहित हा जगातील सहावा क्रिकेटपटू ठरला आहे.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार 5 क्रिकेटपटूंना मारता आले आहेत.

तसेच रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत 350 षटकारांसह  सहाव्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

517 – ख्रिस गेल

476 – शाहिद आफ्रिदी

398 – ब्रेंडन मॅक्यूलम

353 – एमएस धोनी

352 – सनथ जयसुर्या

350 – रोहित शर्मा

महत्त्वाच्या बातम्या –

गेल्या दोन वर्षांत ४६३ गोलंदाजांना जे जमलं नाही ते कुलदीपने करुन दाखवलं

धोनी हैं तो मुमकिन हैं, पहा धोनीने केलेला अफलातून रनआऊट

तर विश्वचषक २०१९नंतरही धोनी खेळू शकतो आंतरराष्ट्रीय क्रिकेट

टाॅप ४- सचिनसह या तीन खेळाडूंनी केल्या आहेत वाढदिवसाच्या दिवशीच शतकी खेळी

अशी आहे विश्वचषक २०१९साठी सौरव गांगुलीची १५ सदस्यीय ‘दादा’ टीम इंडिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment