मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये २१३ जागांवर यश मिळवत पुन्हा एकदा तृणमूल पक्षाने बाजी मारली. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. त्यांनंतर आता मंत्रिमंडळाकडे विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. त्यानुसार भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीकडेही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली.
१० मे रोजी राज्यभवनात ममता बॅनर्जी यांच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात मनोज तिवारीने राज्याचा युवा कल्याण व क्रीडा मंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. त्यामुळे आता मनोज तिवारी पश्चिम बंगालचा क्रीडामंत्री म्हणून काम पाहिल. हाच तिवारी आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करतो आहे.
तिवारीव्यतिरिक्त याआधी अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर राजकारणाचा मार्ग स्विकारला आहे आहे. असे हे काही क्रिकेटपटू-
राजकारण क्षेत्रात काम केलेले भारतीय क्रिकेटपटू
गौतम गंभीर-
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने 2019 साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्याने दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि कायदा आणि न्यायमंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या तो दिल्लीचा खासदार म्हणून कार्यरत आहे. भारतीय क्रिकेट संघाने विजेतेपद मिळवलेल्या 2007 टी20 आणि 2011 वनडे विश्वचषकात गंभीरने महत्त्वाचा वाटा उचलला होता.
नवज्योत सिंग सिद्धू –
भारताकडून 51 कसोटी आणि 136 वनडे सामने खेळताना 7000 पेक्षाही अधिक धावा करणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला आहे. त्यावेळी त्यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूकही जिंकली. तसेच 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते दहा वर्षे अमृतसरमध्ये खासदार होते.
मोहम्मद अझरुद्दीन –
भारताकडून 334 वनडे आणि 99 कसोटी सामने खेळलेला माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही काँग्रेस पक्षाकडून राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधूम लोकसभा निवडणूही लढवली होती आणि ती जिंकून ते खासदारही झाले होते. पण 2014 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला.
मोहम्मद कैफ –
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 2014 मध्ये निवडणूक लढवली होती पण त्याला पराभव स्विकारावा लागला. त्याने भारताकडून 125 वनडे आणि 13 कसोटी सामने खेळले आहेत.
किर्ती आझाद –
भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी भाजपकडून बिहारच्या दरभांगा मतदारसंघातून तीनदा निवडणूक जिंकली आहे. तसेच त्यांचे वडिल भगवंत झा बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. पण किर्ती आझाद यांनी 2019 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
चेतन चौहान –
1969 मध्ये भारताकडून पहिला कसोटी सामना खेळणारे चेतन चौहान यांनीही निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला होता. ते उत्तर प्रदेशमधील अमरोहा मतदारसंघातून दोनदा खासदार झाले होते.
हेही वाचा-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी