फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून इंग्लंडचा भारत दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेचा टप्पा पूर्ण केल्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड संघ टी२० मालिकेच्या तयारीला लागले आहेत. १२ मार्च ते २० मार्च दरम्यान अहमदाबाद येथे ही मालिका पार पडणार आहे. या मालिकेदरम्यान भारतीय खेळाडू पुन्हा एकदा ‘रेट्रो’ थीम जर्सीत दिसतील. बीसीआयने भारतीय खेळाडूंचे ही जर्सी परिधान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, दिपक चाहर, युझवेंद्र चहल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर या जर्सीत फोटोशूट करताना दिसत आहेत. याबरोबरच रिषभ पंत, नवदीप सैनी, इशान किशन, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनीही हा जर्सी घातलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
विशेष म्हणजे, १९९२ सालच्या विश्वचषकात सचिन तेंडूलकर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर अशा माजी भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या वेळी ही जर्सी घातली होती. त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीन भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होते.
त्यानंतर २०२०-२१ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ या ‘रेट्रो’ थीम जर्सीत दिसला होता. आता पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्ध भारतीय खेळाडूंना हीच जर्सी घातलेले पाहायला मिळणार आहे. या नव्या जर्सीचा रंग गडद निळा (नेवी ब्ल्यू) आहे. तसेच या जर्सीवर एमपीएल स्पोर्ट्सचे नावही आहे.
काही महिन्यांपुर्वीच बीसीसीआयने एमपीएलला नवे किट स्पॉन्सर्स म्हणून घोषित केले होते. एमपीएलबरोबर बीसीसीआयने १२० कोटी रुपयांचा अधिक महसूल वाटा असा तीन वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाच्या जर्सीवर एमपीएलचा लोगो दिसणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1369620832239067138?s=20
Test series done and dusted, time to put on the Blues as we get set for the T20s against England#INDVsENG #RP17 pic.twitter.com/SvZ868gMSN
— Rishabh Pant (@RishabhPant17) March 10, 2021
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या-
पंत का राहुल, टी२० संघात कोणाला मिळणार संधी? पाहा काय म्हणाले फलंदाजी प्रशिक्षक
‘सिक्सर किंग’ ही उपमा सर्वात आधी मिळवणाऱ्या ‘या’ भारतीय क्रिकेटरला ओळखले का? पाहा फोटो
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप: ‘लॉर्ड्स’ नव्हे तर ‘या’ ठिकाणी होणार भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना