१. कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने पॅट कमिन्सचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, “तुम्हाला वेगवान गोलंदाजांच्या क्लबची माहिती आहे की नाही हे मला माहित नाही. पहा, पॅट सर्वोत्तम गोलंदाज आहे, याबद्दल काही शंका नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास प्रत्येक वर्षी तो सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिला आहे. मी त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून गोलंदाजी करायला आतुर आहे.”
२. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनही युएईला पोहोचला आहे. युएईमध्ये येताच आयपीएलबद्दल त्याने आशा व्यक्त केली आहे की यावेळी आयपीएलचे विजेतेपद श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील दिल्लीच्या कॅपिटल्सच्या नावावर होईल. पीटरसन आयपीएलमध्ये खेळला असून आता समालोचन करतो.
३. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी दोन ते अडीच महिन्यांपर्यंत आयपीएल खेळणे चांगले राहील, असे भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला वाटते.
४. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी विजय मिळवला. याचबरोबर त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यादरम्यान एक मेजदार किस्सा पाहायला मिळाला. तो असा की, इंग्लंडच्या सॅम बिलिंग्जने जोरदार फटका मारला, तेव्हा मिशेल मार्शला चेंडू आणण्यासाठी पार्किंग क्षेत्रात जावे लागले. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
५. भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने केलेल्या ट्विटने खळबळ उडाली आहे. हरभजनने ट्विटरवर लिहिले आहे की, क्रिकेटविषयीची अशी काही माहिती मला मिळाली आहे, ज्यामुळे तुमचा खेळ पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल होईल. त्याचे हे ट्विट थोड्या वेळाने व्हायरल झाले असून लोक फिक्सिंग, घोटाळे आणि फसवणूकीशी संबंधित जोडताना दिसत आहे.
६. आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाविषयी मोठे वक्तव्य केले आहे. आरसीबी संघ संतुलित आहे या विराटच्या वक्तव्यावर स्टार स्पोर्ट्सने गंभीरला प्रश्न विचारला असता, त्यावर तो म्हणाला, “विराट २०१६पासूनच आरसीबी संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे जर संघाचे संतुलन व्यवस्थित नव्हते, तर त्याने यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे होते.”
७. ऑस्ट्रेलियासाठी दुसर्या वनडे सामन्यापूर्वी आनंदाची बातमी समोर आली आहे. फलंदाज स्टीव्ह स्मिथला शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्याआधी सराव करताना डोक्यावर चेंडू लागला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याला दोनदा डोक्यावर चेंडू लागल्यामुळे कन्कशन चाचणी करण्यास सांगितली होती, त्याने चाचणी पूर्ण केली असून तो त्यात पास झाला आहे. आता तो रविवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्याचा भाग होऊ शकेल. सावधगिरी म्हणून त्याला पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले होते.
८. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी एक अट ठेवली आहे. ते म्हणाले की, ‘त्यांचा संघ तीन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंका दौर्यावर जाण्यास तयार आहे. यजमान देश चौदा ऐवजी सात दिवस क्वारंटाईन ठेवण्याच्या निर्णयावर कायम राहिले तरच संघ श्रीलंका दौऱ्यावर जाईल.’ श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात मालिका जुलै ते ऑगस्टमध्ये होणार होती, पण कोविड -19 साथीच्या रोगामुळे ती 27 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल.
९. माजी भारतीय सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरविषयी मोठे विधान केले आहे. वॉर्नर या आयपीएल हंगामात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दाखवून देईल की, तो एक दमदार कर्णधार आहे आणि ऑस्ट्रेलियाने त्याच्या कर्णधारपदावर बंदी घालून खूप चुकीचे केले आहे, असे चोप्राने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-गोलंदाजीचा सराव करताना मुंबई इंडियन्सच्या या खतरनाक गोलंदाजाने तोडले स्टम्प; प्रशिक्षकही झाले आवक
-आरसीबीचा कर्णधार विराटने ‘या’ गोष्टीवर आधीपासूनच लक्ष दिले असते तर आज…
-ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात आज दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही…
ट्रेंडिंग लेख-
-दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
-हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार
-इरफानला एकाच ओव्हरमध्ये २४धावा कुटणारा ‘ज्युनियर सेहवाग’ आयपीएल गाजवायला सज्ज