पुढील वर्षी एप्रिलमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 13 वा मोसम होणार आहे. या मोसमासाठी जरी अजून सात महिन्यांपेक्षाही अधिक काळ उरला असला तरी अनेक संघांनी संघबांधणीची तयारी सुरु केली आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार 2020 एप्रिलमध्ये सुरु होणाऱ्या या आयपीएलच्या 13 व्या मोसमासाठी यावर्षी डिसेंबरमध्ये खेळाडूंचा एक छोटा लिलाव पार पडणार असल्याची शक्यता आहे.
यावर्षी संघांच्या सॅलरी कॅपमध्ये 3 कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता संघ 86 कोटी रुपयांपर्यंत खेळाडूं संघात घेण्यासाठी खर्च करु शकतात.
सध्या आयपीएलच्या संघामध्ये प्लेअर ट्रान्सफरची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेद्वारा याआधी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघानी त्यांच्या प्रत्येकी एका खेळाडूची आदला बदली (प्लेअर ट्रान्सफर) केली आहे. मुंबईने फिरकीपटू मयंक मार्कंडेचे तर दिल्लीने अष्टपैलू खेळाडू शेरफान रुदरफोर्डचे ट्रान्सफर केले आहे.
तसेच सध्या किंग्स इलेव्हन पंजाबही त्यांचा कर्णधार अश्विनची ट्रान्सफर करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. पण याबद्दल अजून पंजाब संघाकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–क्रिस्तियानो रोनाल्डो की लियोेनेल मेस्सी? विराट कोहलीने घेतले ‘हे’ नाव
–सौरव गांगुली म्हणतो, या खेळाडूंना टीम इंडियात परत सामील करुन घ्या
–रिषभ पंतबद्दल प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मोठे भाष्य, म्हणाले…