Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अहमदाबाद कसोटीत पंतप्रधान मोदी करणार कॉमेंट्री? ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही आजमावलाय हात

March 6, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे पंतप्रधान या सामन्याला हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सामन्यात समालोचन देखील करू शकतात.

उभय संघातील पहिला सामना भारतीय संघाने नागपूर येथे एकतर्फी आपल्या नावे केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पिछाडीवरून पुनरागमन करत विजय संपादन केला. तर, ऑस्ट्रेलियाने इंदोर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात पलटवार करत विजय मिळवला. हा सामना भारतीय संघासाठी जिंकणे अनिवार्य आहे. भारतीय संघाने हा सामना आपल्या नावे केल्यास संघ थेट जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.

हाच सामना अटीतटीचा बनवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍंथनी अल्बानेस हे मैदानावर उपस्थित असतील. सामन्याच्या सकाळीच ते मैदानावर जाणार आहेत. हे स्टेडियम मोदी यांच्याच नावाने उभारले आहे. ते प्रथमच या मैदानावर उपस्थित असतील.

काही सूत्रांच्या हवाल्याने मिळत असलेल्या माहितीनुसार, मोदी हे सामन्याच्या पहिल्या सत्रात समालोचन देखील करताना दिसू शकतात. याबाबत सध्या कोणतीही माहिती सांगितली गेली नाही. दुसरीकडे, अल्बानेस हे क्रिकेटप्रेमी म्हणून ओळखले जातात. ऑस्ट्रेलियात लागलेल्या वनव्यात नुकसान झालेल्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या चॅरिटी सामन्यात ते थेट बारावा खेळाडू म्हणून उभे राहिले होते. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी महिन्यात झालेल्या कसोटी मालिकेत ते समालोचन करताना दिसलेले.

(Indian Prime Minister Narendra Modi Might Be Commentry In Ahmedabad Test Of Border-Gavaskar Trophy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ग्रेस हॅरिसमुळे गुजरातचा सलग दुसरा पराभव, शेवटच्या षटकात कुटल्या संघाच्या गरजेपेक्षा जास्त धावा
बावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?


Next Post
Photo Courtesy: Twitter/@PunjabKingsIPL

रोनाल्डोच्या दातृत्वाचा आणखी एक‌ दाखला! तुर्कीतील भूकंपग्रस्तांची जबाबदारी घेतली खांद्यावर, केली तब्बल इतकी मदत

David Warner

'त्याने निवृत्तीची सर्वोत्तम वेळ गमावली', रिकी पाँटिंगचे आश्चर्यचकित करणारे विधान

IND vs AUS (Rohit Sharma)

"अशा खेळपट्ट्या बनवून तुम्ही स्वतःची कमजोरी लपवता", दिग्गजाचा टीम इंडियाला घरचा आहेर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143