सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवत आणि मालिका 2-0 ने आपल्या खिशात घातली. दोन्ही सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी फ्लाॅप ठरली. भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) फ्लाॅप ठरले. दरम्यान भारताचे माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी कोहलीच्या खराब फाॅर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अलीकडेच न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) 4 डावात 100 धावाही करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कोहलीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असला तरी एमएसके प्रसादला त्याच्या फॉर्मची चिंता लागली आहे. कोहली हे जागतिक क्रिकेटमधील मोठे नाव आहे, पण ऑस्ट्रेलियात भारताला चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) उणीव भासेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जेव्हा एमएसके प्रसाद यांना विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) जोडीबद्दल विचारण्यात आले तेव्हा, ते स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, “2018च्या मालिकेतील त्याची कामगिरी पाहिली, तर एकीकडे विराटने आक्रमक फलंदाजी केली तर दुसरीकडे पुजाराने किल्ला लढवला. आक्रमकतेसह सावधगिरी बाळगणे, आम्ही ती जोडी गमावत आहोत.”
चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) ऑस्ट्रेलियात खूप धावा केल्या आहेत. पुजाराने 25 सामन्यात 49.38च्या सरासरीने 2,074 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने आपल्या 11 अर्धशतकांसह, धमाकेदार 5 शतके झळकावली होती.
एमएसके प्रसाद म्हणाले, “पुजारा एका बाजूने मजबूतीने खेळत होता, तर दुसऱ्या बाजूने विराट आक्रमकता दाखवत होता. विराटच्या फलंदाजीने इतर खेळाडूंनाही प्रेरणा दिली. त्यामुळे सर्वात प्रमुख फलंदाजाचा फॉर्म निश्चितच चिंतेचा विषय आहे, विशेषत: आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप आणि त्यातील गुणतालिकेचा विचार करता.”
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या ‘या’ स्टार खेळाडूने रणजी ट्राॅफीत 68 चेंडूत झळकावले शानदार शतक!
IND vs NZ; तिसऱ्या सामन्यासाठी ‘या’ स्टार खेळाडूची भारतीय संघात एँट्री!
पुनरागमन करताच वॉशिंग्टन सुंदरची किंमत वाढली, हे तिन्ही संघ करोडोंचा खर्च करायला तयार!