---Advertisement---

भारतीय नेमबाजांनी १० मीटर एअर रायफलमध्ये पुन्हा खाल्ला सपाटून मार; ओढवली स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की

On: मंगळवार, जुलै 27, 2021 1:29 PM
---Advertisement---

भारतीय नेमबाजांना टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या पाचव्या दिवशी (२७ जुलै) पुन्हा एकदा काही खास कामगिरी करता आली नाही. १० मीटर एअर रायफलच्या मिश्र गटातील पात्रता फेरी सामन्यात इलावेनिल वलारीवन आणि दिव्यांश सिंग पवार तसेच अंजुम मोदगिल आणि दीपक कुमार यांच्या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे.

दिव्यांश आणि इलावेनिलच्या जोडीने ६२६.५ गुण मिळवत १२ वा क्रमांक मिळवला. दुसरीकडे अंजुम आणि दीपकच्या जोडीने ६२३.८ गुण मिळवत १८ वा क्रमांक पटकावला. (Indian shooters crash out in 10m air rifle mixed qualifications)

विशेष म्हणजे अव्वल ८ जोड्या पात्रता फेरीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये जातात.

-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?

-टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---