---Advertisement---

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला धक्का! मनु भाकर अन् सौरभ चौधरी पदक फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी

---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक २०२० मधील आज (२७ जुलै) पाचव्या दिवसाला सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीलाच भारताच्या हाती अपयश आले आहे. भारताची स्टार नेमबाज मनु भाकरने पुन्हा एकदा निराश केले आहे. असाका शूटिंग येथे १० मीटर एअर पिस्टल मिश्र गटातील पात्रता फेरीच्या दुसऱ्या स्टेजमध्ये भारताचा स्टार नेमबाज सौरभ चौधरी आणि मनु भाकर ही जोडी पदक मिळवण्याच्या फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरली. त्यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सौरभ आणि मनु या जोडीने पात्रता फेरीच्या दुसऱ्या स्टेजमध्ये एकूण ३८० गुण मिळवले. (Indian Shooting Pair of Bhaker, Saurabh fail to qualify for medal match in 10m Air Pistol Mixed Team event)

पात्रता फेरीच्या दुसऱ्या स्टेजमधील अव्वल दोन संघ सुवर्ण पदकासाठी, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा संघ कांस्य पदकासाठी भिडतील.

सौरभने पात्रता फेरीच्या दुसऱ्या स्टेजमधील आपल्या पहिल्या सीरिजध्ये एकूण ९६ गुण मिळवले, तर मनुने ९२ गुणांची कमाई केली. अशाप्रकारे त्यांना पहिल्या सीरिजमध्येच आठव्या स्थानी समाधान मानावे लागले.

दुसऱ्या सीरिजमध्ये सौरभने ९८, तर मनुने ९४ गुण मिळवले. त्यांनी मिळवलेले हे गुण सुवर्ण पदकाच्या सामन्यासाठी पुरेसे नव्हते.

तत्पूर्वी सौरभ आणि मनुने पात्रता फेरीच्या पहिल्या स्टेजमध्ये एकूण ५८२ गुणांची कमाई केल्यामुळे त्यांना पात्रता फेरीच्या दुसऱ्या स्टेजमध्ये स्थान मिळाले होते.

यावेळी सौरभ आणि मनु पहिल्या स्थानावर, तर यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा या जोडीने १७ व्या स्थानावर झेप घेतली होती.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?

-टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन

-तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---