भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने आपला शानदार फॉर्म कायम राखला आहे. भारताचे सर्वच प्रमुख बॅडमिंटनपटू उपांत्य फेरीपर्यंत पराभूत झाल्यानंतर त्याने कॅनडा ओपनची अंतिम फेरी गाठत विजेतेपद देखील पटकावले. विशेष म्हणजे त्याने अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंग याला 21-18, 22-20 असे सरळ गेममध्ये पराभूत करत विजय संपादन केला.
सध्या भारताचा सर्वोत्तम बॅडमिंटनपटू असलेल्या सेन याने या सामन्यात शानदार सुरुवात केली होती. आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकाच्या खेळाडू विरुद्ध तो कसे कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, पहिल्या गेम मध्येच त्याने विरोधी खेळाडूला कोणतीही संधी न देता आघाडी बनवली. ही आघाडी त्याने गेम संपेपर्यंत आपल्या बाजूने ठेवत 21-18 अशी सरशी साधली.
दुसऱ्या गेममध्ये ली याने आपला अनुभव पणाला लावला. त्याने जोरदार मुसंडी मारताना सेन याला पिछाडीवर ढकलत आघाडी बनवण्यास सुरुवात केली. सामना तिसऱ्या गेम मध्ये जाणार अशी स्थिती निर्माण त्याने केली होती. 20-19 अशी निर्णयाक आघाडी त्याच्याकडे होती. या अत्यंत दबावाच्या क्षणी सेन याने आपला दर्जा उंचावत सलग तीन गुण मिळवत सामना आपल्या बाजूने केला.
(Indian Shuttler Lakshya Sen Won Canada Open)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
‘बिल्कुल नाही, ऑस्ट्रेलियाला या पराभवाचा…’, इंग्लंडविरुद्ध हारताच कमिन्सचे मोठे विधान, लगेच वाचा