रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारताचा लेगस्पिनर राहुल शर्माने सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलने ट्विटरवर एक भावनिक पत्र पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2011मध्ये भारताकडून पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने 4 वनडे आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत.
Thanks to all for ur love and support throughout my journey 😊❤️🇮🇳 @BCCI @BCCIdomestic @IPL #retirement pic.twitter.com/anqBGUSwoa
— Rahul Sharma (@ImRahulSharma3) August 28, 2022
आयपीएल 2011 मध्ये पुणे वॉरियर्सकडून खेळताना याने पहिल्यांदा सचिन तेंडुलकरची विकेट घेऊन तो चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने विराट कोहली अन् रोहित शर्मा सारख्या दिग्गजांसोबत टीं इंडियचे प्रतिनिधीत्व केले आहे. 8 डिसेंबर 2011 रोजी भारतासाठी राहुलने मोठ्या नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला, परंतु लवकरच तो वादात सापडला आणि नंतर दुखापतीने त्याला जखडले. राहुलच्या गोलंदाजीची तुलना महान फिरकीपटू अनिल कुंबळेशी करण्यात आली. मात्र, कालांतराने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नामशेष झाला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Asia Cup: माजी क्रिकेटपटूने पाकिस्तान विरुद्ध निवडली भारताची प्लेइंग इलेवन, पंत आणि कार्तिकपैकी…
INDvsPAK: बड्या बड्या बाता नाही करणार, मैदानात करून दाखवणार; पाक कर्णधाराची हुंकार