भारताचि अव्वल धावपटू द्युती चंदची उत्तेजक द्रव चाचणी चाचणी सकारात्मक आली आहे. बुधवारी (18 जानेवारी) प्रतिबंधात्मक पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय अँटी डोपिंग संघटना म्हणजे वाडाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे ती आगामी आशियाई स्पर्धांमध्ये खेळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
चंद हिला लिहिलेल्या पत्रात, AAF ने लिहिले, “आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, तुमचा नमुना A चाचणी वाडाच्या निर्देशांनुसार सकारात्मक आढळली आहे. चंदचा हा नमुना 5 डिसेंबर 2022 रोजी भुवनेश्वरमध्ये घेण्यात आला होता. मात्र, एका क्रीडा संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, याबाबत चंद हिच्याशी संपर्क साधला असता, तिने सांगितले की, आपला नमुना ए पॉझिटिव्ह आला आहे की नाही हे अद्याप मला माहित नाही. तिच्यावरील ही निलंबनाची कारवाई किती दिवसांची असेल याबाबत मात्र कोणतेही वृत्त मिळालेले नाही. परंतु, भारताची प्रमुख धावक अशा प्रकारे निलंबित झाल्याने भारतीय क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
चंद ही भारतीय महिला ॲथलेटिक्समधील मोठे नाव आहे. कमी पडल्यांच्या शर्यतीने भारताला अनेक आंतरराष्ट्रीय पदके मिळवून दिलीत. काही महिन्यांपूर्वीच आपल्या समलैंगिक साथीदारासोबत विवाह केल्याने ती चर्चेत आलेली. तिच्या नावे 100 मीटर शर्यतीतील राष्ट्रीय रेकॉर्ड जमा आहे. तसेच तिने दोन ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या 26 वर्षांच्या असलेल्या चंदवर ही कारवाई किती काळासाठी केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Indian sprinter dutee Chand fails dope test suspended temporary)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या महान फलंदाजांमध्ये शुबमन गिलचेही नाव सामील, सचिनलाही टाकले मागे
‘…तेव्हा वाटले मी द्विशतक करू शकतो’, सामनावीर शुबमन गिलची खास प्रतिक्रिया