भारतीय संघाचा दमदार फलंदाज सूर्यकुमार यादव याने मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने प्रामुख्याने टी-20 फॉरमॅटमध्ये तुफान फटकेबाजी केली आणि संघाला काही महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय देखील मिळवून दिला. नुकत्याच खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमारला संधी मिळाली, पण त्याने चाहत्यांना अपेक्षांवर पाणी फेरले. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात देखील सूर्या मोठी खेळी करू शकला नाही. त्याचे वनडे फॉरमॅटमधील प्रदर्शन पाहता बीसीसीआयला मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला निवडकर्त्ये आणि संघ व्यवस्थापनाने संघात जागा दिली. पण मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले नाही. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली, पण त्याने अवघ्या चार धावांवर विकेट गमावली. सूर्यकुमारला वनडे फॉरमॅटमध्ये संधी मिळावी म्हणून मागच्या मोठ्या काळापासून मागणी होत आली आहे. तसेच टी-20 फॉरमॅटमध्ये त्याचे वादळी खेळी पाहून त्याला निवडकर्त्यांनी वनडे फॉरमॅटमध्येही निवडले गेले. पण तो चाहते आणि संघाच्या अपेक्षांवर खरा उतरू शकत नाहीये.
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना बुधवारी (18 जानेवारी) खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांच्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर विजय मिळवला. सूर्यकुमार या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला पण अवघ्या 31 धावा करून त्याने विकेट गमावली. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे संघातून बाहेर झाल्यामुळे सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, पण यावेळीही त्याला संधीचा फायदा घेता आला नाही, असेच पाहायला मिळते.
सूर्यकुमरच्या टी-20 आणि वनडे प्रदर्शनाचा विचार केला, तर मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. वनडे फॉरमॅटमध्ये सूर्यकुमारने आतापर्यंत 18 सामने खेळले असून यात 29.92 च्या सरासरीने 419 धावा केल्या आहेत. दुसरीकडे टी-20 फॉरमॅटचा विचार केला, तर यात सूर्याची सरासरी 46.41 आहेत. त्याने आतापर्यंत 45 टी-20 सामने खेळले असून 1578 धावा केल्या आहेत. यावर्षी भारतीय संघाला मायदेशात वनडे विश्वचषक खेळायचा आहे. सूर्यकुमारच्या टी-20 प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर निवडकर्ते त्याला आगामी वनडे विश्वचषकात संधी देऊ शकतात, पण यासाठी आगामी काही वनडे सामन्यांमध्ये त्याला चांगला खेळ दाखवाला लागेल. सूर्यकुमारचे वनडे प्रदर्शन सुधारले नाही, तर बीसीसीआयला त्याच्याविषयी कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. (Despite getting opportunities from BCCI, Suryakumar Yadav is not able to take advantage of this opportunity)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्विशतक होताच सचिनकडून साराचा शुबमनसोबत साखरपुडा फिक्स? ट्विट होतंय व्हायरल
भारताच्या महान फलंदाजांमध्ये शुबमन गिलचेही नाव सामील, सचिनलाही टाकले मागे