---Advertisement---

नाद केला! गेल्यावर्षी ढसाढसा रडलेल्या चहलने यावर्षी वर्ल्डकपसाठी टीम इंडियात जागा मिळवलीच

On: सोमवार, सप्टेंबर 12, 2022 8:37 PM
yuzvendra chahal
---Advertisement---

आगामी टी-20 विश्वचषकासाठी सोमवारी (12 सप्टेंबर) भारतीय संघ घोषित केला गेला. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला या संघात संधी दिली गेली आहे. चहलला या संघात निवडल्यामुळे निवडकर्त्यांवरची चाहत्यांची नाराजी काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. मागच्या वर्षी खेळल्या टी-20 विश्वचषकात चहलला चांगल्या फॉर्ममध्ये असून देखील संधी दिली गेली नव्हती. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांनी आणि नंतर त्याने स्वतः देखील नाराजी व्यक्त केली होती. असे असले तरी, आगामी विश्वचषक स्पर्धेतून निवडकर्त्ये त्याला वगळू शकले नाहीत. 

मागच्या वर्षी आयपीएल 2021 हंगाम दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खेळला गेला होता. पहिल्या टप्पा भारतात पार पाडला होता, पण त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएल 2021 चे उर्वरीत सामने यूएईत खेळले गेले होते. पहिल्या टप्प्यात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता, पण दुसऱ्या टप्प्यात त्याने चमकदार प्रदर्शन केले होते. त्याने आयपीएलच्या या हंगामात 15 सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेतल्या. पण तरीही टी-20 विश्वचषकासाठीचा संघ घोषित झाल्यानंतर त्याला निराशाच मिळाली. चहलच्या जागी राहुल चाहरला टी-20 विश्वचषक खेळवले गेले होती. चहल त्यावेळी भारताचा सर्वोत्तम टी-20 गोलंदाज असल्यामुळे, त्याला या संघात स्थान मिळेल असा सर्वांचाच अंदाज होता, परंतु तसे झाले नाही. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांचा चांगलाच संताप व्यक्त केला होता. अनेकांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले होते.

चहलने स्वतः तेखील याविषयी नाराजी व्यक्त केली होती. एका यूट्यूब चॅनलशी बोलताना तो म्हणाला होता की, “जेव्हा तुम्ही टी-20 विश्वचषकाचा भाग नसता, तेव्हा खूप वाईट वाटते. मी कधीच कुणाला विचारले नाही की, टी-20 विश्वचषक 2021 मध्ये माझी निवड का झाली नाही.” चहलव्यतिरिक्त अनेक माजी दिग्गज आणि क्रिकेटच्या जाणाकारांनी त्याला विश्वचषक संघातून वगळल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती.  आयपीएल 2021 चा दुसरा हंगाम सुरू असतानाच (13 ऑक्टोबर 2021) बीसीसीआयने टी-20 विश्वचषकासाठीचा संघ घोषित केला होता. यावरून स्पष्ट होते की, चहल दुसऱ्या टप्प्यात चांगली गोलंदाजी करत असताना देखील त्याला संघात संधी दिली गेली नव्हती. चहल या हंगामात ९ वा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.

भारतीय संघ चहलच्या अनुपस्थितीत टी-20 विश्वचषक खेळला खरा, पण त्यांना अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. संघ प्लेऑफमध्येही स्थान पक्के करू शकला नव्हता. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आयपीएल 2022 मध्ये चहलने स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. त्याने आयपीएलच्या मागच्या हंगामात सर्वाधिक 27 विकेट्स घेतल्या होत्या. आता आगामी टी-20 विश्वचषकात त्याच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असणार आहे.

टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेलाला भारतीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---