---Advertisement---

बांग्लादेश मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा; मोठी अपडेट समोर

On: बुधवार, सप्टेंबर 4, 2024 9:51 AM
---Advertisement---

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. यासाठीची टीम लवकरच जाहीर होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय संघाची घोषणी पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनाही संधी देऊ शकते. पण ते त्याच्या सध्याच्या फॉर्मवर अवलंबून असेल. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळू शकते.

यशस्वी जयस्वालने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. यशस्वी आणि शुबमन गिलचे संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. शुबमनने दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर ही त्याच्यासाठी महत्त्वाची संधी असू शकते. टीम इंडिया सर्फराज खान आणि ध्रुव जुरेललाही संधी देऊ शकते. सर्फराज आणि जुरेल यांनी भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजालाही संधी मिळू शकते. जडेजा हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे.

टीम इंडिया फिरकीपटूंवर विशेष लक्ष देऊ शकते. कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन हे भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांनाही संधी मिळू शकते. भारतीय संघ अर्शदीप सिंगच्या नावावरही विचार करू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती दुलीप ट्रॉफीमधील खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष ठेवणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. पंतने दमदार पुनरागमन केले आहे. तो मुख्य यष्टिरक्षक फलंदाज बनू शकतो.

बांग्लादेशविरुद्ध भारताचा संभाव्य कसोटी संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. मुकेश कुमार, आकाश दीप / अर्शदीप सिंग

हेही वाचा-

“झेंडा ऊंचा रहे हमारा”, पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी!
भारताच्या झोळीत 16वे पदक; वर्ल्ड चॅम्पियन दीप्ती जीवनजीची कांस्यची कमाई
मेहदी हसनची मन जिंकणारी कृती, मालिकावीर पुरस्काराची रक्कम ‘या’ लोकांना केली दान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---