भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या विंडीज दौऱ्यात तीन वनडे, तीन टी20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिका ही आयसीसी टेस्ट चॅम्पियशिपचा भाग असेल. या दौऱ्यासाठी बीसीसीआय निवड समीती 21 जूलैला भारतीय संघाची निवड करणार आहे.
संघाची निवड करण्यासाठी एमएसके प्रसाद अध्यक्ष असणाऱ्या निवड समीतीची 21 जूलैला मुंबईत बैठक होणार आहे. याआधी ही बैठक शुक्रवारी(19 जूलै) होणार होती. पण ही बैठक पुढे ढकलण्यात आली.
याबद्दल एका बीसीसीआय अधिकारीने सांगितले की ‘नियम बदलामुळे काही कायदेशीर पद्धती आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याला थोडा वेळ लागतो.’
तसेच ते म्हणाले, ‘बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन टीमला बैठकीसाठी कर्णधाराच्या उपलब्धतेबद्दल अध्यक्षांना माहिती देणे आवश्यक आहे. तसेच शनिवारी संध्याकाळी खेळाडूंची फिटनेस रिपोर्टही उपलब्ध होणार आहे.’
पुढील वर्षी टी20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने निवड समीती भारतीय संघाची निवड करण्याचे अपेक्षित आहे. तसेच निवड समीतीच्या या बैठकीसाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीही उपस्थित राहणार असण्याची शक्यता आहे.
याबरोबरच विराटला या दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेत विश्रांती दिली जाणार की नाही, हे देखील पहावे लागणार आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर या बैठकीत भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबाबत काय निर्णय होणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
तसेच 2019 विश्वचषकादरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या शिखर धवनबद्दल कोणतेही अपडेट्स देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याच्या निवडीबद्दलही प्रश्नचिन्ह उभे आहे.
सध्या भारत अ संघाचा विंडीजचा दौरा सुरु आहे. त्यामुळे जर वरिष्ठ भारतीय संघातील काही खेळाडूंना विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली तर भारत अ संघाकडून खेळणाऱ्या मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, खलील अहमद, मयंक अगरवाल अशा काही खेळाडूंना वरिष्ठ संघात खेळण्यासाठी संधी दिली जाऊ शकते.
असा असेल भारताचा विंडीज दौरा 2019 –
टी20 मालिका –
3 ऑगस्ट – पहिला टी20 सामना – फ्लोरीडा
4 ऑगस्ट – दुसरा टी20 सामना – फ्लोरीडा
6 ऑगस्ट – तिसरा टी20 सामना – गयाना
वनडे मालिका –
8 ऑगस्ट – पहिला वनडे – गयाना
11 ऑगस्ट – दुसरा वनडे – त्रिनिदाद
14 ऑगस्ट – तिसरा वनडे – त्रिनिदाद
कसोटी मालिका –
22 ते 26 ऑगस्ट – पहिली कसोटी – अँटीग्वा
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर – दुसरा कसोटी – जमैका
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुलाखत: प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये नवा नवीन बघायला मिळेल- नवीन कुमार
–टॉप ७: भारताचे हे क्रिकेटपटू आहेत उच्चशिक्षित
–आयसीसीने क्रिकेटमध्ये लागू केले हे दोन नवीन नियम
–ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार इयान चॅपेल करत आहेत त्वचेच्या कर्करोगाचा सामना