लक्ष्य सेनने भलेही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले नाही. पण त्याने आपल्या दमदार कामगिरीने भारतीय चाहत्यांसह जगभरातील क्रीडा प्रेमींचं मन मात्र नक्कीच जिंकाला. आता भारतीय बॅडमिंटन स्टार एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, त्याला विराट कोहली सारखे बनायचे आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेन पदकासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात होता. पण त्याचे पदक थोडक्यात हुकले होते.
लक्ष्य सेनने कांस्य पदक सामना गमावला होता. मात्र त्याआधी त्याने खूप चांगला खेळ दाखवला होता. आता लक्ष्य सेनने द रणवीर शो मध्ये बोलताना विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केला आहे. सध्याच्या घडीला विराट केवळ क्रिकेटमध्येच नाही तर खेळाच्या जगात तमाम युवा खेळाडूंचा आदर्श आहे. ज्यामध्ये लक्ष्य सेन देखील सामील आहे.
Lakshya Sen said, “I want to be like Virat Kohli of Indian Badminton in the coming years”. (TRS). pic.twitter.com/F0dOddchev
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 29, 2024
यूट्यूब पाॅडकास्टमध्ये त्याला प्रश्न विचारण्यात आले की, तु सुध्दा विराट कोहलीचा चाहता आहे का? उत्तर देताना तो म्हणाला, होय मी सुद्धा विराटचा चाहता आहे. विशेषत: मी त्याची मानसिकता, आक्रमकता आणि भावना दर्शविणारा चाहता आहे. “याशिवाय तो म्हणाला की, त्याला येत्या काही वर्षांत भारतीय बॅडमिंटनच्या विराट कोहलीसारखे व्हायचे आहे. त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्यने ग्रुप स्टेजमध्ये ग्वाटेमालाचा केविन कॉर्डन, बेल्जियमचा ज्युलियन कारागी आणि इंडोनेशियाचा जोनाथन क्रिस्टी यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्याने राॅऊंड ऑफ 16 च्या फेरीत प्रवेश केला होता. 16 च्या फेरीत लक्ष्याचा सामना भारताच्या एचएस प्रणॉयशी झाला. ज्यामध्ये त्याने विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यने चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन-चेनचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर उपांत्य फेरीत लक्ष्याला डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर तो कांस्यपदकासाठी सामना खेळला. मात्र, लक्ष्याला कांस्यपदकाच्या लढतीत मलेशियाच्या ली जी जिआविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
हेही वाचा-
‘खूप वाईट परिस्थिती…’, भारतीय क्रिकेटपटूचे कुटुंब पुरात अडकले, एनडीआरएफ टीम मदतीला!
भारताचं दुर्दैवचं! त्रिशतक झळकावूनही संघाबाहेर; स्टार खेळाडूचे करिअरबद्दल मोठं वक्तव्य
रवी अश्विनने निवडले ऑलटाईम आयपीएल प्लेइंग इलेव्हन, क्रिकेटमधील देवालाच बाहेर!