बुधवारी (दि. 05 जुलै) भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू 28वा वाढदिवस साजरा केला. सिंधूची गणना भारताच्या सर्वोत्तम बॅडमिंटन खेळाडूंमध्ये होते. सिंधूचा जन्म 1995मध्ये हैदराबाद येथे झाला होता. तिने तिचे पदार्पण 2011मध्ये केले होते. यानंतर सिंधू भारताच्या प्रमुख क्रीडा महिलांमध्ये सामील झाली. तिने जवळपास प्रत्येक मोठ्या स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकले आहे. अशात सिंधूच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कामगिरीविषयी खास गोष्टी जाणून घेऊयात…
पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिने अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. मात्र, 2016मधील रिओ ऑलिम्पिक आणि 2020मधील टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा तिच्यासाठी खूपच खास राहिली. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली होती. तसेच, 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्य पदक जिंकले होते. ती ऑलिम्पिंकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच भारतीय बनली होती.
याव्यतिरिक्त सिंधूने 2019मध्ये बेसल येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत किताब आपल्या नावावर केला होता. सिंधू जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली होती. याव्यतिरिक्त तिने 2013 आणि 2014च्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. तसेच, 2017 आणि 2018मध्ये झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. अशाप्रकारे सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत एकूण पाच पदके जिंकली होती.
दुसरीकडे सिंधूने आशियाई स्पर्धांमध्येही भाग घेत दोन पदके आपल्या नावावर केली आहेत. तिने 2018मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्यापूर्वी 2014मध्ये इंचियोनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये सिंधूने कांस्य पदक आपल्या नावावर केले होते.
खरं तर, सिंधूने बॅडमिंटन जागतिक महासंघात सर्वाधिक रँकिंग क्रमांक 2 मिळवला आहे. ही रँकिंग तिने एप्रिल 2017मध्ये आपल्या नावावर केली होती. या सर्वांव्यतिरिक्त सिंधूने स्विस ओपन, सिंगापूर ओपन आणि सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय यांसारख्या अनेक बॅडमिंटन जागतिक महासंघ दौऱ्यातील विजेतेपद पटकावले आहेत. (indian star badminton player pv sindhu birthday get to know look at her career achievements unknown facts know here)
महत्वाच्या बातम्या-
सात्विक-चिरागने इंडोनेशियात फडकावला तिरंगा, मानाची स्पर्धा जिंकत रचला इतिहास
थायलंड ओपनमध्ये किरण जॉर्जची अनपेक्षित मुसंडी, सिंधूचा अनपेक्षित पराभव