मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघ खेळाडूंच्या दुखापतींमुळे चिंतेत आहे. यामध्ये स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहेत. अशात भारतीय क्रिकेटमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल याच्याविषयी आहे. केएल राहुल आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी पूर्णपणे फिट झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
केएल राहुल (KL Rahul) आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर झाला होता. मात्र, केएल राहुलने सरावाला सुरुवात केली आहे. तो फलंदाजीसोबतच नेट्समध्ये यष्टीरक्षणचाही सराव करत आहे. तो सध्या बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे असून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तयारी करत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, केएल राहुल पूर्णपणे फिट झाला आहे. तो आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत निवडीसाठी उपलब्ध राहणार आहे. तसेच, तो भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. राहुल मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामार्फत त्याच्या फिटनेसविषयी माहिती देत आहे. तो फलंदाजी आणि यष्टीरक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. एनसीएमधील कर्मचारी राहुलवर विशेष लक्ष देत आहेत. त्याच्या रिकव्हरीवर खूप कामही करण्यात आले आहे. अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा सराव करतानाचा व्हिडिओ समोर आला तो नेट्समध्ये खूप मेहनत घेत आहे.
आयपीएल 2023मध्ये झालेली दुखापत
राहुल आयपीएल 2023 स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. क्षेत्ररक्षण करताना त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर राहुलने ऑपरेशनही केले होते. आता तो मैदानावर परतला असल्याने लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. खरं तर, राहुलने भारतीय संघासाठी अखेरचा वनडे सामना मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तसेच, अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारी 2023मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. राहुलने आयपीएल 2023मध्ये अखेरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळला होता. अशात चाहते त्याच्या त्याला पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. (indian star batsman kl rahul fully fit for asia cup 2023 team india selection)
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीजने मोडला भारताचा गर्व! 200व्या सामन्यात रोखला विजयरथ; काय होता 1, 50, 100 अन् 150व्या सामन्याचा निकाल?
पदार्पणात चमकला तिलक वर्मा! फिल्डिंग करताना पकडला अविश्वसनीय Catch, पाहून तुम्हीही कराल कौतुक