---Advertisement---

पदार्पणात चमकला तिलक वर्मा! फिल्डिंग करताना पकडला अविश्वसनीय Catch, पाहून तुम्हीही कराल कौतुक

Tilak varma
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात गुरुवारपासून (दि. 03 ऑगस्ट) टी20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत 5 सामने खेळले जाणार आहेत. यातला पहिलाच सामना भारताने गमावला आहे. वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फंलदाजी करत वेस्ट इंडिज संघाने 20 षटकात 6 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत भारताने 20 षटकात 9 विकेट्स गमावून फक्त 145 धावाच केल्या. भारताने हा सामना केवळ 4 धावांनी गमावला. यात भारतीय संघाकडून दोन युवा खेळाडू तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांनी आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पदार्पण केले. अशात सामन्यातील तिलक वर्माच्या उत्कृष्ट झेलाने सर्वांचे लक्ष वेधले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सामना चालू असताना वेस्ट इंडिज संघाने 2 विकेट्स गमवून 58 धावा केल्या होत्या. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आठवे षटक टाकण्यासाठी आला. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जॉन्सन चार्ल्सने उंच फटका मारला आणि चेंडू डीप मिड-विकेटच्या दिशेने गेला. तो चेंडू तिलक वर्मा (Tilak Verma) याच्यापासून दूर होता. मात्र, त्याने चेंडूच्या दिशेने धाव घेत जवळ पोहोचताच उडी मारली आणि एका हाताने अप्रतिम झेल घेतला.

हा झेल पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. भारत संघातील सर्व खेळाडूंनी तिलकचे अभिनंदन केले. या झेलामुळे तिलकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. त्याचा हा झेल घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तिलक याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात 39 धावांची एक आक्रमक फलंदाजी केली. भारतीय संघाने 28 धावांवर दोन विकेट्स गमावल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर तिलकला फलंदाजीसाठी संधी मिळाली. तिलकने आपल्या आयुष्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचला. त्याने वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या षटकात एकापाठोपाठ 2 षटकार मारले. तिलकने 177.27 या स्ट्राईक रेटने 22 चेंडूत 39 धावा केल्या. या सामन्यात तिलकने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. (cricketer tilak varma in debut pulls off blinder catch to leave fans stunned against west indies)

महत्तवाच्या बातम्या:  
खळबळजनक! कर्णधारपदाचा राजीनामा देत स्टार खेळाडू आशिया चषकातूनही बाहेर, क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण
अर्रर्र! पराभवानंतर पंड्याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, यादीत धोनी आणि रहाणेचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---