पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाने प्रथमच राऊंड ऑफ 16 फेरी गाठून इतिहास रचला. भारताने अखेरीस उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीकडून लढाई गमावला. जिथे अर्चना कामथ ही गेम जिंकणारी एकमेव पॅडलर होती. भारत हा सामना 1-3 ने हरला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. खरे तरं आता याच खेळाच्या क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे . जे की, अर्चना कामथच्या संदर्भात आहे. तिने टेबल टेनिस सोडण्याचा निर्णय घेतली आहे.
2028 मधील ऑलिम्पिक गेम्समध्ये पदकाची कोणतीही हमी नसताना, युवा पॅडलर अर्चना कामथने व्यावसायिकरित्या टेबल टेनिस सोडण्याचा निर्णय घेतली आहे. खेळात आर्थिक परतावा मिळत नसल्यामुळे, अर्चनाने त्याऐवजी परदेशात शिक्षण घेण्याचे ठरवले आहे. पॅरिसमधून मायदेशी परतल्यानंतर 24 वर्षीय कामथने तिची प्रशिक्षक अंशुल गर्गशी पुढील गेम्समध्ये पदक जिंकण्याच्या संधींबद्दल स्पष्टपणे बोलली आहे. अर्चनाच्या या भूमिकेने हैराण झालेल्या प्रशिक्षकाने प्रामाणिकपणे उत्तर दिले आहे.
View this post on Instagram
🚨 Archana Kamath quits Table Tennis to pursue economics at the University of Michigan
24 yo Archana was part of Indian’s Table Tennis Team at the recently concluded Paris Olympics 2024 pic.twitter.com/OD6QXz92He
— The Khel India 2.0 (@BharatAtOlympic) August 21, 2024
अर्चनाची प्रशिक्षक अंशुल गर्गनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले – “मी तिला सांगितले की हे अवघड आहे. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. ती जगातील टॉप-100 च्या लिस्टमधून बाहेर आहे. परंतु गेल्या काही महिन्यांत तिच्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. पण मला वाटते तिने आधीच जाण्याचा निर्णय घेतला आहे. आणि एकदा तिने आपला निर्णय घेतला की ते बदलणे कठीण आहे.”
अर्चनाच्या ऑलिम्पिकसाठी निवड झाल्याबद्दल बरेच वाद झाले, परंतु तिने वादाकडे लक्ष देण्याऐवजी तिच्या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि खरोखरच चांगली कामगिरी केली. ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवूनही तिने अभ्यासालाच आपले करिअर करण्याचे ठरवले आहे. अर्चना म्हणाली- माझा भाऊ नासामध्ये काम करतो. तो माझा आदर्श आहे आणि तो मला अभ्यासासाठी प्रोत्साहनही देतो. त्यामुळे मी माझा अभ्यास पूर्ण करण्यासाठी वेळ काढत आहे आणि मी त्याचा आनंद घेत आहे. मी अभ्यासातही हुशार आहे.
हेही वाचा-
टी20 विश्वचषकाच्या विजयात या तीन खेळाडूंनी बजावली सर्वात महत्त्वाची भूमिका, रोहित शर्माचा खुलासा
हात-पाय तोडून मग…, कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर युझवेंद्र चहलची तिखट प्रतिक्रिया
बार्बाडोसनंतर टीम इंडिया पाकिस्तानात तिरंगा फडकावणार? जय शहांनी केली मोठी भविष्यवाणी