भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या ब्रेकवर आहे. यादरम्यान हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सुंदर ठिकाणी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. पांड्यानं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो पाण्यात थांबलेला दिसत आहे. तत्पूर्वी अलीकडेच, भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली, पांड्या या मालिकेचा भाग नव्हता. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेचा तो भारतीय संघाचा भाग होता.
सध्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पांड्यानं 2 फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो पाण्यात एन्जाॅय करताना दिसत आहे. पांड्याचे इंस्टाग्रामवरचे 2 फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेतून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुनरागमन करू शकतो, असं मानलं जातं आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या टी20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये खेळवला जाणार आहे, तर दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये तिसरा सामना रंगणार आहे.
हार्दिक पांड्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 11 कसोटी, 86 एकदिवसीय आणि 102 टी20 सामने खेळले आहेत. 11 कसोटी सामन्यात त्यानं 31.39च्या सरासरीनं 532 धावा केल्या. कसोटीमध्ये त्यानं 4 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 108 आहे. त्यानं 86 एकदिवसीय सामन्यात 34.01च्या सरासरीनं 1,769 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्यै त्यानं 11 अर्धशतक ठोकली आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 92 आहे. पांड्यानं 102 सामन्यात 141.28च्या स्ट्राईक रेटनं 1,523 धावा केल्या. दरम्यान त्यानं 4 अर्धशतक झळकावली, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 71 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप, ‘या’ दिग्गजाने दिला आपल्या पदाचा राजीनामा
रोहित-विराटला दुलीप ट्रॉफीत न खेळवण्याच्या निर्णयावर संतापले गावसकर; म्हणाले…
“यंदा टी20 विश्वचषक खेळणं धोका आहे” ऑस्ट्रेलिया दिग्गजाचं मोठं वक्तव्य!