यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु सुरुवातीच्या दोन सामन्यात भारतीय संघाचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. पाकिस्तान संघाने पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभूत केले होते. तर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत केले होते.
त्यामुळे भारतीय संघाला जर उपांत्यफेरीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर, ३ नोव्हेंबर रोजी अफगानिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कुठल्याही परिस्थितीत मोठ्या अंतराने विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे या निर्णायक सामन्यात भारतीय संघात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
वरूण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विनला संधी
मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूण चक्रवर्तीला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. परंतु या दोन्ही सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. त्यामुळे अफगानिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला संघाबाहेर करून आर अश्विनला संधी दिली जाऊ शकते. आर अश्विन संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० गडी बाद केले आहेत.
मोहम्मद शमीच्या जागी राहुल चाहरला संधी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या फॉर्ममध्ये दिसून येत नाहीये. त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. या दोन्ही सामन्यात त्याला एकही गडी बाद करता आला नाही. त्यामुळे अफगानिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याच्याऐवजी फिरकी गोलंदाज राहुल चाहरला संधी दिली जाऊ शकते. तो आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात देखील चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यामुळे राहुल चाहरला संधी दिल्यास नक्कीच भारतीय संघाला फायदा होऊ शकतो.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशचा खेळ खल्लास करण्यासाठी उतरणार दक्षिण आफ्रिका, सेमीफायनलसाठी ठोकणार दावेदारी!
‘या’ ३ अनफिट खेळाडूंवर विश्वास दाखवून निवडकर्त्यांनी केली चूक? टी२० विश्वचषकात ठरतायत फेल